उरण (विठ्ठल ममताबादे) : कामगार नेत्या तथा काँग्रेसच्या नेत्या श्रुती शाम म्हात्रे यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होत महाराष्ट्रातील शेगाव येथे राहुल गांधी यांची भेट घेतली व विविध समस्यांवर त्यांनी चर्चा केली.2004 मध्ये पनवेल विधानसभा मतदार संघात तर 2009 साली उरण विधानसभा मतदार संघात आमदारकीचे उमेदवार असलेले दिवंगत लोकनेते शाम म्हात्रे यांच्या श्रुती म्हात्रे या कन्या आहेत. अनेक प्रचारात राहूल गांधी यांनी कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या कार्याचे कौतूक केले होते. वडिलांच्या पाऊलावर पाउल टाकत काँग्रेसच्या नेत्या श्रुती म्हात्रे यांनीही कांग्रेसच्या पक्षाला बळकटी आणून गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहेत. राहुल गांधी यांना भेटल्यावर श्रुती म्हात्रे यांनी कामगार क्षेत्रातील बदललेले नवीन कामगार कायदे व नवीन रोजगार व शैक्षणिक समस्या संदर्भात चर्चा केली. यावेळी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात श्रुती म्हात्रे करत असलेल्या कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी श्रुती म्हात्रे यांना शुभेच्छा दिल्या.
भारत जोडो यात्रेत श्रुती म्हात्रे यांनी साधला राहूल गांधी यांच्याशी संवाद.

69 Views