अलिबाग (अमूलकुमार जैन ) : रायगड जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण हे शास्वत विकासाचे एक महत्त्वाचे ध्येय असून दर्जेदार शिक्षण या ध्येयावर भरीव कामगिरी व्हावी यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या अंतर्गत आदर्श शाळा टप्पा -२ करिता रायगड जिल्हा परिषद (प्राथमिक)शिक्षणाधिकारी यांनी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे (VSTF ) अधिकारी रत्नशेखर गजभिये यांच्यासह अलिबाग आणि मुरूड तालुक्यातील शाळांना भेट दिली.
शिक्षण ही समाजात निरंतर चालणारी उद्दिष्टपूर्ण प्रक्रिया आहे. जागतिक स्तरावर शास्वत विकासाचे प्रमुख सतरा ध्येय निश्चित करण्यात आलेली आहेत, त्यापैकी दर्जेदार शिक्षण हे शास्वत विकासाचे एक महत्त्वाचे ध्येय आहे दर्जेदार शिक्षण या ध्येयावर भरीव कामगिरी केल्यास निश्चितपणे इतर देशाच्या विकासावर त्याच्या सकारात्मक प्रभाव पडेल ही बाब लक्षात घेऊन (VSTF ) महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून आदर्श शाळा निर्माण करण्याच्या हेतूने व्हीएसटीएफ आदर्श शाळा विकास कार्यक्रम टप्पा -२ व गुणवत्तापूर्ण शिक्षण निधीतून आदर्श शाळा निर्माण करणे हे अभियानाचे प्रमुख ध्येय आहे. अभियानाच्या माध्यमातून बहुतेक सुविधा गुणवत्तापूर्ण शिक्षण, शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण,पर्यावरण स्नेही शाळा व आरोग्य आणि पोषण, आनंदाची शिक्षण इत्यादी उद्दिष्टांवर कार्य सुरू आहे. 21 व्या शतकाची आव्हाने सक्षमपणे पेलू शकणारा विद्यार्थी निर्माण करणे हे त्यामुळे शासनाच्या प्रमुख कार्यक्रमात शिक्षण हा विषय प्राधान्यक्रमावर असतो. कोणत्याही कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक असतो या अभियानात प्रामुख्याने शाळांमध्ये भौतिक सोयी सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण, आनंददायी शिक्षण आणि पर्यावरण पूरक शाळा या पाच महत्त्वपूर्ण विषयावर काम सुरू आहे. या कामास गती देण्यासाठी VSTF तर्फे मागील वर्षी जिल्हा रायगड जिल्हयातील मुरूड आणि अलिबाग तालुक्यातील शाळांमधील शाळाकरिता कामे करण्यात आलेली होती.जिल्ह्यात शाळांमध्ये चांगली कामे व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांचे सहकार्याने यावर्षी पाच शाळांची निवड करणे अपेक्षित आहे, याकरिता अलिबाग तालुक्यातील दोन शाळा , मुरुड तालुक्यातील दोन शाळा व सुधागड तालुक्यातील एक शाळा निवडण्याचे निश्चित केले आहे. ज्यामध्ये शाळेची निवड करणे, आदर्श शाळा विकास आराखडा तयार करणे,त्यात शासकीय कृतिसंगम, लोकसहभाग, श्रमदान व VSTF निधी देण्यात येतो. यामध्ये आदर्श शाळा विकास आराखडा तयार करणे, त्यात शासकीय कृतिसंगम,लोकसहभाग,श्रमदान व VSTF निधी देण्यात येतो. भेटी दरम्यान शिक्षणाधिकारी म्याडम द्वारा शाळेतील भौतिक सुविधांची पाहणी करण्यात आली, तसेच गुणवत्तावाढीच्या उपाय योजना संदर्भात चर्चा करण्यात आली, शाळेतील विध्यार्थी सोबत चर्चा करण्यात आली, सदर भेटी दरम्यान उपस्थित शिक्षण समिती पदाधिकारी, शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांचेशी VSTF अंतर्गत आराखड्यात घेण्यात येणाऱ्या कामाबाबत चर्चा करण्यात आली व पोषण आहारची गुणवत्ता व शाळेसंबंधित बाबींची तपासणी करण्यात आली .शाळा भेटी दरम्यान गावातील काही जागरूक पालक वर्ग,गावकरी,शिक्षणप्रेमी देखिल उपस्थित होते.याप्रसंगी शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांनी VSTF द्वारा होत असलेल्या कामाची स्तुती करून या कामाकरिता जिल्हा परिषदेमार्फत सहकार्य करण्याची हमी दिली.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे (VSTF) बाबत अधिक माहिती देताना रत्नशेखर गजभिये यांनी सांगितले की, तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 1000 गावे आदर्श करण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरूवात केली होती. या अभियानांतर्गत शासनाच्या विविध विभागांच्या कृती संगमातून ग्रामपंचायतींमध्ये सामाजिक व मुलभुत सोई सुविधांना चालना देण्यासाठी कार्पोरेट कंपन्यांची मदत घेण्यात येत आहे. आदर्श ग्राम निर्माण करताना ग्रामपंचायती सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांना ग्रामविकासाचे चॅम्पियन्स म्हणून कार्य करण्याचा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे.महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत मानवी निर्देशांक कमी असलेल्या गावांची निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींमध्ये तांत्रिक मार्गदर्शनासाठी व पायाभुत सुविधा निर्माण करण्याठी ग्राम परिवर्तकांची नेमणूक करण्यात आली आाहे. हे ग्राम परिवर्तक प्रशासन आणि ग्रामपंचायत यांचा दुवा म्हणून कार्यरत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामपंचायतींला मिळवून देण्यासाठी ग्राम परिवर्तकांमार्फत गाव विकास आराखडा तयार करण्यात येतो. त्यामध्ये ग्रामपंचायतींच्या गरजा ओळखून ग्राम सभेच्या माध्यमातून कामे प्रस्तावित करण्यात येतात. यामध्ये सरपंच व ग्रामसेवक यांची महत्त्वाची भुमिका आहे. हे ओळखून शासनाने सरपंच व ग्रामसेवक यांना अधिक सक्षम करण्याचे धोरण आखले आहे.महाराष्ट्रातील आदर्श ग्रामपंचायती म्हणून पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजार जि. अहमदनगर, अण्णा हजारे यांच्या राळेगणसिध्दी, भास्करराव पेरे यांच्या पाटोदा जि. औरंगाबाद अशा ग्रामपंचायतींनी लोकसहभागातून उत्कृष्ट काम करून इतर ग्रामपंचायतीसाठी आदर्श निर्माण केला आहे. अशा आदर्श ग्रामपंचायतींची प्रेरणा घेऊन, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तनात निवड गावांतील सरपंच व ग्राम सेवकांनी आपल्या ग्राम पंचायतीमध्ये कार्य करावे व आदर्श ग्राम निर्माण करावे, ही अपेक्षा आहे. त्यासाठी एक प्रशिक्षणाचे मॉड्यूल तयार करण्यात आले असून, त्याद्वारे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
यशदाचे राज्यातील अमरावती, नागपूर, जळगाव, औरंगाबाद व बारामती येथे विभागीय प्रशिक्षण केंद्रे आहे. त्याद्वारे राज्यातील सरपंच व ग्रामसेवकांना प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे. यामध्ये संबंधित जिल्ह्यातील ग्राम परिवर्तक, जिल्हा कार्यकारी व व्हिएसटीएफचे नोडल अधिकारीसुध्दा सहभागी झालेले आहेत.
सदर प्रशिक्षणामध्ये ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, शासकीय योजनांमध्ये लोकसहभाग मिळविणे, ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक करणे, ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय इमारती, देखभाल व दुरूस्ती, गाव विकास आराखड्यातील प्रस्तावित कामांना गती देणे अशा काही महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, सरपंच व ग्रामसेवकांनी आदर्श ग्राम निर्मितीवर लक्ष केंद्रीत करून ठराविक वेळेत गाव विकास आराखड्यातील कामे पूर्ण करण्यावर भर द्यायचा आहे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सरपंच व ग्रामसेवकांना प्रोत्साहन देण्यासाठी आदर्श सरपंच व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देण्याचेही धोरण अभियानामार्फत आखण्यात आली आहे.