दत्तजयंती निमित्ताने उरण नगरपालिकेत बैठक.

Share Now

199 Views

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण शहरातील देऊळवाडी येथील दत्त मंदिर येथे मोठ्या प्रमाणात दत्तजयंती ची 7 डिसेंबर 2022 रोजी यात्रा भरणार आहे. अनेक वर्षांपासून दत्त जयंतीला उरण शहरात यात्रा भरत असते.उरण तालुक्यातील सर्व गावातील लोक या यात्रेसाठी येत असतात तर या ठिकाणी मुंबई पनवेल गोवंडी मुंब्रा कुर्ला येथून खेळणी विक्रेते स्टॉल धारक सर्व प्रकारचे व्यापारी दुकानदार येत असतात अशा वेळी वाहतूक कोंडी शांतता व सुव्यवस्था यासाठी उरण मध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्यधिकारी राहुल इंगळे उरण पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड, जगदाने आदी मान्यवर उपस्थित होते. सुरवातीला प्रस्तावित नगर परिषदेचे अधिकारी झुंबर माने यांनी केले. यावेळी शहर चिटणीस शेकाप शेखर पाटील यांनी वाहतूक कोंडी दुर होण्यासाठी कोटनाका येथील पेट्रोल पंप शेजारच्या मैदानात तर चारफाटा च्या पुढे मुळेखंड फाटा तर मोरा परीसरात तील नागरिक जुना राजीव गांधी टाऊन हाल च्या शेजारच्या मैदानात करावी तसेच दुकानदार याना ओळखपत्र व रुग्णवाहिक डॉक्टर फायर ब्रिगेड च्या गाड्या तैनात ठेवाव्यात असे सुचवले. तसेच स्वयंसेवी संस्था यामध्ये होमगार्ड, सामाजिक संस्था यांची गर्दी नियंत्रण करण्यासाठी मदत घ्यावी असे सुचवले. यावेळी सीमा घरत, दिलीप पाटील, प्रकाश पाटील, नगरसेवक कौशिक शहा, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांनी सूचना मांडल्या या सर्व सूचना चा नक्कीच विचार करून दत्त जयंती उत्सव साजरा करू या असे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सांगितले.तर वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलीस नेमण्यात येतील तसेच नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखावी असे आवाहन पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड यांनी केले.यावेळी उरण शहरातील विक्रेते, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *