बलकर टॅकरमध्ये धोकादायक रितीने भरताना मिळुन आल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Share Now

82 Views

अलिबाग:(अमूलकुमार जैन) रायगड जिल्ह्यातील हमरापूर येथे मानवी जीवनासाठी धोकादायक असणारी सिंठ्याटिक फ्लोअरस्पर डस्ट ही मानवी जीवनासाठी धोकादायक असताना सुध्दा मोहंमंद अब्दुल रोशन जमीर,राहणार (४२/३२३काशमुर बाब निशाणी जवळ,अहमदनगर, जगायापलेम, पेडागण त्याडा,विशाखापट्टणम, आंध्रप्रदेश),सन्ताम सरदार मेजर सिंग,*वय ४२वर्षेराहणार टकले तालुका-०पट्टी,जिल्हा, तारण,पंजाब),ब्रिजेश रघुनाथ पाटील, (वय ४२वर्षे,राहणार वरेडी,तालुका पेण, जिल्हा रायगड,सध्या राहणार पेण पोलीस लाईन मागे,पेण, रायगड) या तिघांनी बलकर टॅकरमध्ये धोकादायक रितीने भरत असताना दादर पोलिसांना मिळुन आल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी वीस लाख पंधरा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत सविसर वृत्त असे की,पेण तालुक्यातील मौजे मौजे हमरापूर गावचे हददीतील हमरापूर दादर रोडचे बाजूस असणारे पोल्ट्री फार्म येथे दिनांक २३ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजून३०मिनिटाच्या सुमारास मोहम्मद अब्दुल रोशन जमीर याने त्यांचे मालकीचे सिंठ्याटिक फ्लोअरस्पर हे केमिकल ड्रस्ट हवेमध्ये उडून मनुष्याच्या तोंडात गेल्यास ती विषारी स्वरुपाची असल्याने आरोपी तसन्ताम सरदार मेजर सिंग,,ब्रिजेश रघुनाथ पाटील ह्यांच्या मदतीने संगतमत करीत सदरचे केमिकल ड्स्ट खुल्या पोल्ट्री शेडमध्ये पांढ-या रंगाच्या मोठया प्लास्टीकच्या बॅगांमध्ये बाळगुन ते त्यांचे ताब्यातील हायड्डा क्रेनच्या सहायाने बलकर टॅकरमध्ये धोकादायक रितीने भरताना मिळुन आले व सदरची केमिकल डस्ट ही विषारी असून मानवी आरोग्यास अतिशय घातक असल्या बाबत माहीती असताना देखील मानवी जिवित व्यक्तींची व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात येईल अश्या पध्दतीने हयगयीचे वर्तन करुन आपला आर्थिक फायदा करुन घेण्याचे उददेशाने सदरचे कृत्य करताना मिळून आले आहे.दादर पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून ३,५७,५००/- रुपये किंमतीचे सिंठ्याटिक फ्लोअरस्पर हे केमिकल डस्ट असलेल्या १ टन क्षमतेच्या एकूण २५ मोठया पांढ-या रंगाच्या प्लास्टीकच्या बॅगा त्यामध्ये असलेल्या केमिकल डस्टची किंमत प्रती किलो १४.३० रुपये प्रमाणे,१३,५७,५००/- रुपये,१०,००,०००/- रुपये किंमतीचा,एक टाटा कंपनीचा बलकर टॅकर त्याचा क्रमांक के ३४ बी ५०७१ असा असलेला व त्यामध्ये ३,५७,५००/- रुपये किंमतीचे २५ टन सिंठ्याटिक फ्लोअरस्पर हे केमिकल डस्ट असलेले केमिकल डस्टची किंमत प्रती किलो १४.३० रुपये प्रमाणे, ३,००,००० /- रुपये एक हायड्रा क्रेन त्याचा नंबर एम एच ०६ ओएल ६६०४ असा असलेला जुना वा. किं.अं., ५० रिकाम्या मोठया पांढ-या रंगाच्या प्लास्टीकच्या बॅगा एकूण २०,१५,००० /- रुपये मुद्देमाल जप्त करीत तीन आरोपीविरुद्ध दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भौड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.