पिरकोन गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

Share Now

63 Views

उरण :(विठ्ठल ममताबादे ) रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील पिरकोन गावातील सामाजिक कार्यकर्ते कै.गजानन जनार्दन पाटील यांचे मंगळवार दिनांक २२ नोव्हेंबर २०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या अंत्ययात्रेस प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

कै. गजानन पाटील हे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरकोनचे माजी चेअरमन होते.त्यांनी शे.का.पक्षाचे झुंजार व परखड विचारांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना जागरूक करण्याचे कार्य केले.पिरकोन हायस्कूल व डी.एड.च्या शैक्षणिक कार्यात उरणचे माजी सभापती कृ.द.जोशी यांच्या खांद्याला खांदा लावून ते सक्रिय सदस्य म्हणून कार्य होते. त्यांच्या अशा अल्पशा आजाराने निधन झाल्याने पाटील कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. त्यांची दशक्रिया विधी गुरुवार दिनांक १ डिसेंबर २०२२ रोजी वशेणी खाडी बहिरीदेव देव येथे सकाळी ०७ वाजता होणार असून उत्तर कार्य विधी शुक्रवार दिनांक २ डिसेंबर २०२२ रोजी राहत्या घरी पिरकोन येथे होणार आहे. तसेच उत्तर कार्य दिनी वशेणी येथील प्रसिद्ध कीर्तनकार अनिल बुवा यांचे सकाळी ०९ वाजता कीर्तन होणार आहे. गजानन पाटील यांच्या निधनाने पिरकोन ग्रामस्थ तसेच आप्तेष्ट पाटील परिवारावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.