केंद्रीय मंत्री नारायण राणे अलिबाग न्यायालयात हजर:न्यायालयाने दिली पुढची पाच तारीख

Share Now

258 Views

अलिबाग : (अमूलकुमार जैन) तालुका प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणात केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आज दिनांक 1 डिसेंबर2022 रोजी रायगड जिल्ह्यातील जिल्हा न्यायालयात उपस्थित राहिले होते. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आपण आल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. यावेळी नारायण राणे यांचे वकील मानशिंदे यांनी सांगितले की,न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आज न्यायालयात हजर राहिलो होतो. न्यायालयाने पुढील तारीख पाच जानेवारी ही दिली आहे.त्यादिवशी परत उपस्थित राहणार असून केस ही डिस्चार्ज करून घेण्याचा प्रयत्न करू.
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज जिल्हा न्यायालयात येणार असल्याने न्यायलायच्या आसपास कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दि .(23 ) ऑगस्ट रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. नारायण राणे यांना महाड न्यायालयात हजर केल्यानंतर रायगड पोलिसांकडे दोन वेळा हजेरी लावण्याचे आदेश दिले होते.मात्र 31 ऑगस्ट 2021 रोजी नारायण राणे यांनी प्रकृती ठीक नसल्याचे सांगून वकिलांमार्फत पोलीस स्थानकात म्हणणे मांडले होते. तद्नंतर 13 सप्टेंबर रोजी दुसरी हजेरीच्या वेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे त्यांचे वकील अॅड. संग्राम देसाई, अॅड. संदेश चिकणे,तत्कालीन जिल्हाध्यक्ष महेश मोहिते,अंकित बंगेरा यांच्यासाहित उपस्थित राहिले होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईसह कोकणात जनआशीर्वाद यात्रा काढली. या यात्रेदरम्यान २३ ऑगस्टला महाड येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याला शिवसेनेने आक्षेप घेतला होता. तसेच महाड शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर, रत्नागिरी येथील जनआशीर्वाद यात्रेत २४ ऑगस्ट रोजी राणे यांना अटक करून महाड न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे राणे यांना सशर्त जामीन मंजूर केला होता. यादरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यादृष्टीने न्यायलायच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *