चाईल्ड केअर तर्फे आश्रम शाळेतील मुलांना अन्नदान.

Share Now

275 Views

उरण (विठ्ठल ममताबादे )सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरणचे कार्याध्यक्ष विक्रांत कडू यांच्या तर्फे उरण तालुक्यातील चिरनेर येथील आश्रम शाळेमधील 250 मुलांना अन्नदान करण्यात आले . तसेच उरण तालुक्यातील उल्लखनीय कार्य करणाऱ्यां

1)विवेक पाटील, पागोटे(समाज सेवा )

2)चेतन पाटील, खोपटे (अभिनय )

3)आकांक्षा भोईर, भेंडखळ (गायिका )

4)भूषण भोईर, मोठीजुई (नुत्यदिग्दर्शक)

यांचा समानचिन्ह, शाल, श्रीफळ, संस्थेचे प्रमाणपत्र, तुळशी रोपटे, पुष्पगुच्छ देऊन “उरण विशेष सम्मान पुरस्कार 2022” देऊन सम्मान करण्यात आले. हा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक विकास कडू यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. अन्नदानाचे आश्रम मधील जवळ जवळ 250 मुलांनी आणी आजू बाजूच्या परिसरातील शेकडो आदिवासी बंधु भगिनीनी लाभ घेतले. अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा चिरनेरचे मुख्याधापक अप्पासाहेब मोरे यांनी आपले मनोगत मांडताना म्हणाले कि “चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण, रायगड चे नाव आज पर्यंत ऐकले होते परंतु त्यांचे कार्य आज अनुभवले.संस्थे ने आज वर अनेक आदिवासी वाड्यामध्ये कार्यक्रम केले हे उल्लखनीय आहे त्या बद्दल मी संस्थेचे संस्थापक विकास कडू व त्यांचे व सहकारी यांचे करावे तितके कौतुक कमी पडेल आमच्या आश्रम मध्ये अन्न दान केले त्याबद्दल मी संस्थे चे खूप खूप आभारी आहे ”
तर जाणता राजा प्रतिष्ठान पागोटे चे अध्यक्ष विवेक पाटील आपले मनोगत मांडताना म्हणाले कि “चाईड केअर सामाजिक संस्थे ला मिळालेला हिरा म्हणजे संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष विकास कडू यांचे कार्य आज उरण तालुक्यात नव्हे तर रायगड जिल्हा मध्ये सुरु आहे ते या संस्थेला नक्की साता समुद्रा पार नेतील याची मला खात्री आहे ”

तर संस्थे चे संस्थापक, अध्यक्ष विकास कडु आपल्या मनोगत मध्ये म्हणाले कि “आज वर 7 वर्ष अनेक ठिकाणी संस्थे ने विविध कार्यक्रम केले परंतु या आश्रमात जी मुलांना शिकवण मिळते ती खूप मोलाची आहे त्या बद्दल आश्रम मधील शिक्षक वर्ग व कर्मचारी यांचे करावे तितके कौतुक कमी आहे. आम्ही या आश्रमाला नक्कीच मुलांना जीवनावश्यक वस्तू आणी आमच्या परीने मदत यापुढेहि देत राहू ” कार्यक्रमा प्रसंगी अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा चिरनेरचे मुख्याध्यापक अप्पासाहेब मोरे व शिक्षक वर्ग आणि कर्मचारी उपस्थित होते तसेच संस्थेचे संस्थापक विकास कडू, कार्याध्यक्ष मनोज ठाकूर, कार्याध्यक्ष विक्रांत कडू, उपाध्यक्ष तुषार ठाकूर, कार्याध्यक्ष कु. ह्रितिक पाटील, खजिनदार राजेश ठाकूर, सह खजिनदार कु उद्धव कोळी, सदस्य कु विवेक कडू, आमोल डेरे, समीर पाटील, रोशन धुमाळ ह्यांनी कार्य पार पाडण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली.कार्यक्रमाचे निवेदन विकास कडू यांनी केले तर आभार प्रदर्शन विक्रांत कडू यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *