माजी नगराध्यक्षा नमिता नाईक यांना जयंतीनिमित्त अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने अभिवादन

Share Now

271 Views

अलिबाग:(अमूलकुमार जैन )अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष स्व. ॲड. नमिता प्रशांत नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अलिबाग_नगरपरिषद कार्यालय येथे मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी नमिता नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले अ. यावेळी माजी उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष सुरक्षा शाह, माजी नगरसेवक प्रदीप नाईक, अनिल चोपडा, वृषाली ठोसर, संजना किर, यावेळी नगरपालिका अधिकारी कर्मचारी ,नागरिक उपस्थित होते.

कायद्याचे शिक्षण घेतलेल्या नमिता नाईक २००६ सालापासून राजकारणात सक्रिय होत्या. नगरसेवक ते नगराध्यक्ष पदापर्यंत त्यांनी मजल मारली. तब्बल अडीच वर्षे त्या नगराध्यक्षपदी विराजमान होत्या, त्याचप्रमाणे त्यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या सभापतीपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *