महाड (निलेश लोखंडे) खाडीभाग हा आपला गड आहे. आणि आपला गड हा आपलाच राहणार आहे. येथे फितूरांना, गदृदारांना थारा नाही. हा आपला गड असून असे अनेक गड उभे करणार आहोत. येणारा काळ आपलाच असणार आहे. हा निवडणूकीचा मेळावा नाही, तर हा शिवसैनिकांचा मेळावा आहे. हा मेळावा निश्चित यशस्वी झाला आहे. आता यापूढे आणखी मेळावे घेवू. असे माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी स्पष्ट केले.
खाडीपट्टयातील अप्पर तुडील येथे महाड तालुका मतदारसंघातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शिवसैनिकांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यांत आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेना नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर दक्षिण जिल्हा प्रमुख अनिल नवघणे, दक्षिण जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम, मराठा मुस्लीम सेवा संघ महाराष्ट ॲड. फकीर ठाकूर, दक्षिण जिल्हा अधिकारी बंटी पोटफोडे, महाड तालुका अधिकारी प्रुफुल धोंडगे, महाड तालुका सहसंपर्क ॲड. मंगेश हुमणे, महाड तालुका सहसंपर्कप्रमुख दिलीप आंबवले, जमिर देशमुख यांच्यासह महाड तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
अनंत गिते यांनी आपल्या घणाघाती भाषणात विरोधकांचा चांगलाच समाचार घेताना पुढे म्हणाले की, सत्ता मिळवा मात्र सत्ता मिळवून केलेत काय ॽ असा थेट प्रश्न करित सत्ता मिळाली मग महाराष्ट राज्याच्या जनतेचे हित साधले पाहिजे होते. जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे होते. रोजगार उपलब्ध करुन दिला पाहिजे होता. युवकांचे, महिलांचे, वृध्दांचे प्रश्न सोडवले पाहिजे होते. सत्ता मिळवण्यामध्ये काही गैरे नव्हतं, मात्र सत्ता मिळवल्यावर तुम्ही शिवाचे नाव संपवायची घोषणी केलीत. आणि शिवाचे नाव संपवण्याकरिता 40 गदृदार झाले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन अपमानित करुन उतरवणारा शिवसैनिक असू शकतो का ॽ असा प्रश्न उपस्थित शिवसैनिकांना विचारला असता नाही म्हणून मोठया आवाजात शिवसैनिकांनी उत्तर दिले.
यावेळी जनतेतून पालकमंत्री म्हणून बोलण्यांत आल्यावर गिते म्हणाले की, आपल्याला कोणाच्या स्वप्नांचांसुध्दा विचार करण्याची गरज नाही. मात्र हे निश्चित आहे की, आजचा मेळावा ही एक झळक आहे. असे गिते बोलले. यावेळी अन्य मान्यवरांची देखील भाषणे झाली.