आमदार निधीतून 22 लाख रुपयांच्या अद्यावत रुग्णवाहिकाचे लोकार्पण : आ. भरत गोगावले

Share Now

786 Views

महाड (दीपक साळुंखे) आमदार निधीतून सुमारे 22 लाख रुपये एवढा निधी देऊन उपलब्ध करून देण्यात आलेल्या अद्यावत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात येत असल्याची घोषणा महाड विधानसभा मतदार संघाचे आ. भरत गोगावले यांनी केली आहे.

महाड एमआयडीसी मधील एमएमए कोविड सेंटर या ठिकाणी रविवार 30 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी एक वाजता लाइफ सपोर्ट सिस्टिम असणाऱ्या अद्यावत रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आ. भरत गोगावले, जिल्हाप्रमुखांनी नवगणे, माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, उपजिल्हाप्रमुख पद्माकर मोरे, महाड उत्पादक संघटनेचे जयप्रकाश शेट्टी, महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ भास्कर जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर ई.जी. बिराजदार, डॉक्टर श्रीमती पाटील, महाड विधानसभा संपर्कप्रमुख विजय सावंत, पं. समितीच्या सभापती सौ ममता गांगण, पं. समिती सदस्या सौ दीपिका शेलार, तालुकाप्रमुख सुरेश महाडिक, पोलादपूर तालुकाप्रमुख नीलेश अहिरे, राजीप सदस्य संजय कचरे, चंद्रकांत कळंबे, मनोज काळीजकर, नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते बंटी पोटफोडे, शहरप्रमुख नितीन पावले, युवा सेनेचे सिद्धेश पाटेकर, विभागप्रमुख भगवान पवार, संजय शिंदे, चंद्रकांत कालगुडे आदि मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी पुढे बोलताना आ. भरत गोगावले यांनी अति दुर्गम तालुका ओळखले जाणाऱ्या पोलादपूर तालुक्याकरिता अद्यावत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र सध्या कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही रुग्णवाहिका महाड एमआयडीसी मधील एमएमए कोविड सेंटर या ठिकाणी कार्यरत ठेवण्यात येईल नंतर ही रुग्णवाहिका पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे आमदार गोगावले यांनी स्पष्ट केले. म्हाडा इमारत दुर्घटनेतील बाधितांच्या पाठीशी शिवसेना संघटना ठामपणे अभ्यासून नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेत बाली झालेल्या पाल्यांचे पालकत्व स्वीकारले असून दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करून इमारतीमधील बाधीत सदनिकाधारक व भाडेकरू यांना न्याय मिळवून देण्याकरिता आपण प्रयत्नशील आहोत. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्व दोषींविरोधात कठोर कारवाई व्हावी अशी आपली आग्रही भूमिका असल्याचे देखील आमदार गोगावले यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गणपती विसर्जन करताना
आ. भरत गोगावले यांच्या महाड तालुक्यातील पिंपळवाडी येथील मूळ गावी गणपती विसर्जन करीत दुखापत झाल्याची बाब समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *