रायगड मेडिकल असोसिएशनचे रौप्य मोहत्सवानिमित्त ११ व १२ जानेवारी रोजी रिलायन्स टाउनशीपमध्ये महाअधिवेशन, जागतिक कीर्तीच्या डॉक्टरांची उपस्थिती 

Share Now

538 Views

रोहा (उदय मोरे) रायगड मेडिकल असोसिएशन रौप्य  महोत्सव वर्षे असल्याने ११ व १२ जाने. रोजी डॉक्टरांचे महाअधिवेशन नागोठणे येथील रिलायन्स कंपनीच्या टाऊनशिप येथील बालगंधर्व हॉलमध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष नेत्रतज्ञ डॉ. देवेंद्र जाधव यांनी दिली. या अधिवेशनामध्ये जागतिक कीर्तीचे विविध आजारावर उपचार करणारे तज्ञ डॉक्टर उपस्थित राहून अधिवेशनामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.      

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश श्रीखांडे अध्यक्ष आरआयएल एनएमडी, मुख्य वैद्यकीय अधिकारी आरआयएल एनएमडी डॉ. उद्धव कुमार, डॉ. परवेज ग्रॅंट , मिसेस वर्ल्ड अभिनेत्री डॉ. अदिती गोवित्रीकर, डॉ. विठ्ठल लहाने, लाईफ लाईन हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. प्रकाश पाटील. डॉ. जयश्री पाटील. डॉ. किरण नाबर, डॉ. केशव काळे, डॉ. विक्रम तावडे, डॉ. अकलेश पाडेकर, डॉ. संजय व्होरा, डॉ. मनोज श्रीवास्तव, डॉ. पारिजात गुप्ते, डॉ. आशुतोष सिंग, डॉ. मनीष कारेकर, डॉ. नीरज आडकर, डॉ. केतन देशपांडे, डॉ. तन्वी हळदीपूरकर, डॉ. देवेंद्र वेंकट्रॉमनी , डॉ. अमित चक्रवर्ती, डॉ. अपूर्व भट, डॉ. आवेश शिंगरे, डॉ. रविकांत झाला, डॉ. इमान कदम, डॉ. प्रवीण करकरे, डॉ. एस.यु.कुलकर्णी आदी तज्ञ डॉक्टरांसह मुंबई, नवी मुंबई, पुणे व महाराष्ट्रातील नामांकित हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. तसेच यानिमित्त मिसेस आरएमए स्पर्धा विवाहित महिला डॉक्टरांसाठी खास आयोजित करण्यात आली आहे. या शिबिराचा लाभ रायगड जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांनी घ्यावा असे विनम्र आवाहन रायगड जिल्हा मेडिकल असो. अध्यक्ष डॉ. देवेंद्र जाधव, सेक्रेटरी डॉ. पुरुषोत्तम भोईर, खजिनदार डॉ. रघुनाथ भट, ऑर्गनायझेशन चेअरमन डॉ, निशीत ध्रुव, डॉ. अशोक जाधव, डॉ. आनंद वागळे यांनी मेडिकल असो.च्या वतीने केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *