रोह्यातील महिलांसाठी वुमन्स क्लब हाऊस एक उत्तम वास्तू ; खा. सुनील तटकरे

Share Now

352 Views

धावीर रोड (अंजूम शेटे) महिलांसाठी महाडा वसाहत रोहा येथे उत्तम पद्धतीने वुमन्स क्लब हाऊस उभारला आहे. ह्या गोष्टीचा मनस्वी समाधान आहे. शहरातील महिलांसाठी विविध सुविधा असल्या पाहिजे महिलांना त्यांच्या कर्तबगारीसाठी मोकळीक मिळाली पाहिजे. रोहा शहरासह महाडा परिसर दिवसेंदिवस विकसित होत आहे. या ठिकाणी महिलांच्या विरंगुल्यासाठी एक वेगळा ठिकाण असावा, विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठी, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी एक वास्तू असावी अशा विविध कारणाने वास्तू उभारण्यात यश मिळाले असल्याचा आनंद आहे. महिलांसाठी वुमन्स क्लब हाऊस एक उत्तम वास्तू असून या वास्तूचा उत्तम प्रकारे वापर व्हावा असे प्रतिपादन रायगडचे लोकप्रिय खा. सुनील तटकरे यांनी उदघाटन शुभारंभ प्रसंगी केले.

रोहा अष्टमी नगरपरिषद उर्दू शाळा येथे आयोजित कार्यक्रमात खा. तटकरे बोलत होते. वुमन क्लब हाऊस,रोहा डोंगरी मोहल्ला भागातील नागरिकांना येजा करण्यासाठी सुसज्ज रस्ता, रोहा उर्दू शाळा नुतनीकरण कामाचे उदघाटन खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते, ना. आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्याक्ष मधुकर पाटील, प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपनगराध्यक्ष रिजवाना शेटे, आरोग्य सभापती महेंद्र दिवेकर, गटनेते महेंद्र गुजर, नगरसेवक राजेंद्र जैन, महेश कोलाटकर,
सभापती अफरीन रोगे, ज्येष्ठ नगरसेवक अहमद दर्जी, नगरसेविका शिल्पा धोत्रे, पुर्वा मोहीते, गीता पडवळ, सारिका पायगुडे यांसह सर्व नगरसेवक, नगरसेविका व राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खा. तटकरे पुढे म्हणाले की, वुमन्स क्लब हाऊस या वास्तुचे कोविडचा प्रादुर्भाव होण्या अगोदर खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. दीड वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये राज्याचे उत्पन्न घटलेला असताना केंद्राची फारशी मदत मिळाली नसताना सुद्धा ही वास्तू उभारण्यासाठी यश मिळाले. मला खात्री व विश्वास आहे की शहरातील महिलाभगिनी या वस्तूचा उत्तम प्रकारे उपयोग करतील, नवीन नवीन कल्पना त्यांच्या मनात येतील, नवीन नवीन कल्पना जोड देत असतानाच महिला बचत गटांसाठी एक भवन असेल असे ही तटकरे यांनी बोलताना सांगितले. उर्दूमधून केलेला काव्य, शेर शायरी व त्यातून अनेक प्रबोधनाची चांगल्या गोष्टी अनेकांना मिळत असतात. उर्दू शाळा एक उत्तम इमारत आहे. कोविड काळात विविध उपक्रमांसाठी व कोविड सेंटरसाठी या इमारतीचा उपयोग झाला आहे. असे ही शेवटी तटकरे यांनी बोलताना सांगितले.
       
गेल्या काही दिवसापासून खा.सुनील तटकरे यांच्यामुळे रोहा शहरात लसीकरण मोहीम सर्व नगरसेवक यांच्या पुढाकाराने अतिशय चांगल्या पद्धतीने सुरु असून जास्तीत जास्त नागरिकांना कोविडपासून बचाव करण्याची भूमिकाही सर्व लोकप्रतिनिधींनी ठेवली. असे ना. आदिती तटकरे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाल्या की, वुमन्स क्लब हाऊसमध्ये पुढच्या काळात महिलांचे कार्यशाला वारंवार चांगल्या पद्धतीने व्हावे, महिलांना योग्य पद्धतीने त्याचा वापर करता यावा या दृष्टीने नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक उपनगराध्यक्ष व सभापती यांनी पुढाकार घ्यावा असे ना. तटकरे यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहा अष्टमी नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी, उर्दू शाळेतील मुख्याध्यापक,
सर्व शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *