माणगाव तालुक्यात मिळाले तब्बल 12 नवे कोरोना रुग्ण

Share Now

848 Views

माणगांव (आदित्य माने )कोविड १९ रोगाचा संसर्गाला सुरुवात झाल्यानंतर बराच काळ माणगांव तालुका हा कोरोना रोगाच्या संसर्गापासून लांब राहीला होता मात्र मागच्या आठवड्यापासून कोरोना संसर्ग झालेल्या वक्तींमध्ये वाढ होताना दिसत आहे दि 23 मे रोजी माणगाव तालुक्यामध्ये पन्हळघर, कालवण, सरसवाडी, उमरोली, चरई, कळमजे, मुगवली, खर्डी, कवीलहवाळ, गेल्या दोन दिवसापूर्वी कॉरंटाइन केलेले नागरिक आणि दवाखान्यात ओपीडीसाठी येणारे रुग्ण यांच्या तपासणी दरम्यान स्वाबमधून हे सर्व रुग्ण मिळाले आहेत.

मोठ्या प्रमाणात आज माणगाव तालुक्यात मिळालेल्या रुग्णांमुळे तालुक्यात घबराटीचे वातवरण निर्माण झाले आहे तसेच प्रशासन सुद्धा योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करत आहे. माणगाव तालुक्यात चाकरमानी मोठ्या प्रमाणात चालत येत असल्याने तसेच ग्रामीण भागात मुंबई तसेच इतर गांवातुन येणाऱ्या चाकरमान्यांचा वाढता कल असल्यामुळे माणगांव तालुक्यातील नाही तर आजुबाजुच्या नागरीकांनी प्रशासनाचे अध्यादेश पाळुन सुरक्षित राहणे व आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *