वरसे ग्रामपंचायती मार्फत महिलांचे लसीकरण, खा. तटकरेंच्या वाढदिवसाची अनोखी भेट

Share Now

314 Views

अष्टमी (महेंद्र मोरे) रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रम करून वरसे ग्रामपंचायत साजरी करत आहे. सध्या कोरोना प्रतिबंधक लसिकरणावर राज्यशासनाने भर दिला आहे.याची जाण ठेवत पालकमंत्री ना. आदिती तटकरेंच्या माध्यमातून वरसे ग्रामपंचायती मधील महिलांचे करिता स्वतंत्र लसीकरण शिबीर घेत त्यांना खा.तटकरेंच्या वाढदिवसाची अनोखी भेट ग्रामपंचायतीचे सर्वेसर्वा मधुकर पाटील, सरपंच नरेश पाटील, उपसरपंच मनोहर सुर्वे, जेष्ठ सदस्य रामा म्हात्रे, ग्रा.पं. सदस्य अमित मोहीते व सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र नाक्ती यांनी दिली आहे. सोमवारी या शिबिराचा शुभारंभ पालकमंत्री यांचे हस्ते करण्यात आला. आपल्या पालकमंत्र्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण विनासायास उपलब्ध करून दिल्याबद्दल महिला वर्गाने समाधान व्यक्त करत शिस्तबद्ध पद्धतीने आपले लसीकरण करून घेत या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला दिसून आला.

रोहा शहरालगत असलेली शहरी व ग्रामीण अशी समिश्र लोकवस्ती असलेल्या वरसे ग्रामपंचायतीच्या वतीने खा. सुनील तटकरेंच्या वाढदिवसानिमित्त विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत.रक्तदान शिबीर, जिवनावश्यक वस्तू वाटप, या सोबतच ग्रामपंचायती मधील महिलांचे कोरोना लसीकरण होणेही गरजेचे असल्याने त्यासाठी पालकमंत्र्यांनी त्यांचे माध्यमातून उपलब्धता करावी अशी विनंती मधुकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली केली होती. त्यांच्या या सामाजिक जाणिवेतून केलेल्या मागणीची दखल पालकमंत्री यांनी घेत महिलांचे लसिकरणासाठी सर्व यंत्रणा व कोविशिल्ड लस उपलब्ध करून दिली.ग्रामपंचायत सभागृहात या विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ३०० महिलांचे लसीकरण करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील यांनी महिलांचे लसिकरणासाठी पालकमंत्री यांनी घेतलेल्या पुढाकारा बद्दल त्यांचे आभार व्यक्त करत ८४ दिवसानंतर दुसरा डोस ही येथेच देण्यात येणार असे आवाहन आज लसीकरण केलेल्या महिला वर्गाला केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.