मुस्लिम समाजाने विरोधात मतदान केल्याचा फटका अनंत गीतेंना बसला : आ. भरतशेठ गोगावले

Share Now

976 Views

महाड (दीपक साळुंखे) केंद्रामध्ये पुन्हा मोदी सरकार येऊ नये म्हणून मुस्लिम समाजाने विरोधात मतदान केल्याचा फटका केंद्रिय मंत्री नामदार अनंत गीते यांना रायगड लोकसभा निवडणुकीत बसला असल्याचे प्रतिपादन आमदार भरतशेठ गोगावले यांनी केले आहे. आमदार भरत गोगावले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत खरवली काळीज याठिकाणी शुक्रवार 31 मे 2019 रोजी दुपारी 1 वा वचनपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी व्यासपीठावर आमदार भरतशेठ गोगावले दक्षिण रायगड युवा सेना अधिकारी विकास गोगावले राजिप सदस्य मनोज काळीजकर माजी राजिप सदस्या सौ सुषमा गोगावले महाड पंचायत समितीच्या सभापती सौ सपना मालुसरे, माजी राजिप सदस्य संजय कचरे, उपतालुकाप्रमुख संदीप झांजे, विभागप्रमुख लक्ष्मण भोसले, उपविभाग प्रमुख गणेश साळुंखे, गोपीनाथ सावंत, तंटामुक्त अध्यक्ष अर्जुन पवार ,सुभाष उर्फ बंधू महामुणकर, भारतीय विद्यार्थी सेनेचे समीर महामुणकर, शाखाप्रमुख सुरेश कळमकर, सरपंच सौ मनाली मनोज काळिजकर, उपसरपंच शिवाजी राजाराम कदम, ग्रामविकास अधिकारी प्रदीप महामुणकर, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी पुढे बोलताना आमदार गोगावले यांनी ग्रामपंचायतींनी केलेल्या विकासकामांचे उद्घाटन भूमिपूजन तसेच जिल्हा परिषद फंडातून व ग्रामपंचायतीच्या मागासवर्गीय समाज पंधरा टक्के ग्रामपंचायत फंडातून साहित्याचे वाटप असा दुहेरी योग घडून आणत वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला वचनपूर्ती सोहळा निश्चितच पुढील वाटचाली करिता प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त करून 1 जून 2019 रोजी होणारा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून जनतेच्या शुभेच्छा महाड तालुक्यातील ढालकाठी येथील शिवनेरी या निवासस्थानी स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केले.
ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या कार्यकाळात प्रत्येक सरपंचाने चांगली कामगिरी केली मात्र मनाली काळिजकर यांचे पती जिल्हा परिषद सदस्य असल्याने त्यांना अधिक चांगली कामगिरी करता आली. भविष्यकाळात बिरवाडी व खरवली काळीज ग्रामपंचायतींमधील सांडपाण्याची समस्या मार्गी लावण्याकरिता कायमस्वरूपी उपाययोजना काढण्याचा संकल्प आमदार गोगावले यांनी व्यक्त केला. केंद्रामध्ये मोदी नकोत म्हणून मुस्लिम समाजाने विरोधात मतदान केल्याने त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत नामदार अनंत गीते यांना बसल्याने महाड विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे मताधिक्य घटले .मात्र जनतेच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा आमदार होऊन नामदार होण्याची संधी आपल्याला मिळेल असा विश्वास अामदार भरतशेठ गोगावले यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केला. मुस्लिम समाजाने मोदींविरोधात मतदान करून सुद्धा केंद्रामध्ये एकहाती सत्ता स्थापित करण्यात एनडीएला यश आल्याने विधानसभा निवडणुकीमध्ये देखील शिवसेना भाजप युतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार असल्याने या वेळी मंत्रिपदाची संधी निश्चित मिळेल असा दावा आमदार गोगावले यांनी या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *