रोहा अष्टमी न.पा.चे रस्ते देतात होडीत बसल्याचा आनंद, दुरुस्तीकडे कायम दुर्लक्ष

Share Now

699 Views

रोहा (प्रतिनिधी ) रोहा अष्टमी शहरातील बहुतेक रस्ते प्रचंड खराब झालेत. भुयारी ड्रेनेज गटाराच्या नावाखाली एकाचवेळी रस्त्यांची तोडफोड केल्याने अनेक रस्ते सद्यस्थितीत धोकादायक झाल्याचे समोर आले. त्यातील अनेक रस्त्यांची काँक्रेट दुरुस्ती युध्दपातळीवर सुरु आहे. त्यात आधीचे मूळ रस्ते डांबरी असल्याने खोदलेल्या रस्त्याला देण्यात येणारा दुरुस्ती काँक्रेट मुलामा कुचकामी ठरणार असल्याचे उघड आहे. त्यामुळे बहुतेक रस्ते खडबडीत राहणार, पावसात रस्त्यांवर खड्डे पडणार ? याच शक्यतेत मुख्यतः बायपास रस्तानजीक दमखाडीच्या प्रवेशद्वारासमोरील सातमुशी साकाववरून शहरात, कोलाडकडे जाताना रस्त्यात पडलेले महाभयंकर खड्डे अक्षरशः होडीत बसल्याचे आनंद देत असल्याची अनुभूती रोजची आहे. त्या रस्त्यावरून येजा करताना कंबरेचा खुळखुळा होतो. रस्त्याला बायपास असल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावे लागत आहे. याच डेंजर झोन रस्त्यांच्या दुरुस्तीकडे रोहा अष्टमीच्या कारभाऱ्यांनी कायम दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून आता संताप व्यक्त होत आहे.
रोहा अष्टमी शहरात करोडो रुपये खर्चाची विकासकामे सुरु आहे. मात्र त्यातील बहुतेक कामांत नागरिकांना फारसे संतोष दिसत नाही. दुसरीकडे गटारे व अन्य कामांच्या नावाखाली भलतेच गोंधळ प्रशासनात पाहायला मिळते. टॅक्स पियर नागरिकांचे लाखो रुपये टॅक्स सहभाग नेमके कशावर खर्च होते ? याबाबत शंका नेहमीच उपस्थित होते. त्यातच रोहा नगरपरिषदेच्या रस्त्याच्या दुतर्फातील चक्काजाम हातगाडी हटाव, प्लॅस्टीकमुक्त्त शहर योजनेला सद्या हरताळ फासल्याचे स्पष्ट आहे. याकडे प्राशासकीय अधिकारीही गांभीर्याने लक्ष देत नाहीत. राजा तथा प्रधान उक्तिप्रमाणे राज्याकडे डोळसपणे पाहीले जात नाही. याचाच फटका रोहेकर,
ग्रामीण नागरिकांना बसत आहे. ड्रेनेज गटाराच्या कामासाठी शहरातील सर्वच रस्ते धडाधड फोडले. त्यातील बहुतेक रस्त्यांची दुरुस्ती आता कॉंक्रेटीकरणातुन सुरु आहे. हा कॉंक्रेटचा मुलामा पावसात कितपत टिकेल, याच शाश्वतीत दमखाडीतून वरसेकडे जाणाऱ्या रास्त्यांच्या प्रचंड खड्डयांची भर पडली आहे.
रोहा नगरपरिषदेच्या दमखाडीतून वरसेकडे जाताना मुख्य प्रवेशद्वार शेजारील बायपास जोड़ रस्त्याला भलेमोठे खड्डे पडलेत. मागील वर्षभरापासून खड्यांच्या दुरुस्तीकडे कोणीच लक्ष दिलेले नाही. मुळात हा रस्ता बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याचे काहींनी भासवले. त्यावर बांधकाम विभागाचे अधिकारी घाडगे यांनी हा रस्ता नगरपालिकेचा आहे. त्यामुळे नगरपरिषद प्राशासन रस्त्याची दुरुस्ती का करीत नाही ? हे मोठेच कोडे आहे. रस्त्यावरुन येजा करताना होडीत बसल्यासारखे सतत जाणवते पण त्यात मऊपणा नसल्याने कंबरेचा अक्षरशः खुळखूळा होत असल्याचे सांगत प्रवाशी लाखोल्या घालतात. रसत्याबाबत विविध संस्था, नागरिकांनी तक्रारी केल्या. पण त्या तक्रारींना नगरपरिषद प्राशासन नेहमीप्रमाणे केराची टोपली दाखविली. त्याच रस्त्यावरुन नवे खासदार, आमदार रोहा शहरात राजरोस येतात. त्या सर्वांना खड्यांचा त्रास जाणवत नाही हे सुध्दा चर्चेत आले. दरम्यान, सातमुशी साकावसमोरील भलेमोठे खड्डे रोहा नगरपरिषद आतातरी बुजविल का, किमान खड्यांना कॉंक्रेटचा मुलामा देतील का ? याची नव्याने प्रतिक्षा आहे तर नगरपरिषदेच्या सावळा गोंधलात नागरिक प्रवाशी जीवघेण्या खड्यांचा सफर होडीतून एकदाचे केव्हा उतरतील ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *