उरण ( विठ्ठल ममताबादे ) सध्या सर्वत्र विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा रंगत आहे. नाक्या नाक्यावर उरण विधानसभा मतदारसंघात आमदारकीच्या पदासाठी कोण उभारणार याची चर्चा सुरू आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आतापासून राजकीय मोर्चा बांधणीला सुरुवात केली आहे. विधानसभा मतदारसंघात आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. अशातच उरण विधानसभा मतदारसंघात नवीन चेहऱ्याला संधी मिळावी अशी जनतेची इच्छा आहे. नवीन चेहऱ्याला संधी मिळाल्यास उरण विधानसभा मतदारसंघातील विकास झपाट्याणे वाढेल असा नागरिकांचा विश्वास आहे. त्यातूनच उरण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उरण तालुक्यातील बोरखार गावचे सामाजिक कार्यकर्ते तरुण तडफदार नेतृत्व तेजस डाकी यांचे नाव समोर येत आहे.
तसे बघितल्यास तेजस डाकी हे नाव उरण विधानसभा मतदारसंघातील जनतेला नवीन नाही. कारण तेजस डाकी अनेक वर्षापासून उरण विधानसभा मतदारसंघातील विविध तालुक्यात विविध भागात सामाजिक कार्यात ते अग्रेसर आहेत. त्यामुळे त्यांच्या चांगल्या कार्याची नेहमी जनतेत चर्चा होत असते. तेजस डाकी यांचे विचार व कार्य जनतेला चांगल्या प्रकारे माहित आहे. तेजस डाकी हे उरण तालुक्यातील बोरखार गावचे सुपुत्र आहेत. त्यामुळे स्थानिक भूमीपुत्र म्हणून जनता त्यांच्याकडे आदराने पाहते. बोरखर गावात मुलगी जन्मली की त्या मुलीच्या कुटुंबाला तेजस डाकी यांच्या कडुन पाच हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाते. तसेच गावात कोणी मयत झाला तर त्याला दहा हजार रुपये तेजस डाकी देतात. मुलीच्या लग्नासाठी २५ हजार रुपये देतात. उरण तालुक्यात होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी भरभरून ते देणगी देत असतात. शिवजयंती निमित्ताने अन्नदान तसेच आर्थिक मदत देखील तेजस डाकी करतात.
उरण तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमांना देखील ते मदत करतात. यावर्षी क्रिकेट सामन्यांना ११ मोटरसायकल देखील त्यांनी दिल्या. साई भंडारा साई दिंडी या सर्वांना नेहमी आर्थिक मदत तेजस डाकी करत असतात. नवरात्रोत्सव तसेच गणेशोत्सव मंडळानाही ते सढळ हस्ते आर्थिक मदत करत असतात. सामाजिक बांधिलकी जपत मनात कोणताही स्वार्थ न ठेवता समाजाच्या कल्याणासाठी रात्रं दिवस झटणारा समाजसेवक म्हणून तेजस डाकी उरण मध्ये व आजूबाजूच्या परिसरात नावारूपास आले आहेत. उरण विधानसभा मतदारसंघाची आमदारकीची उमेदवारी त्यांना दिल्यास नक्कीच विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे मार्गे लागतील. तेजस डाकी यांच्याकडे विकासात्मक दृष्टिकोन असल्याने तेजस डाकी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उरण विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवावी अशी मागणी उरण विधानसभा मतदारसंघातील जनतेने केली आहे. अपक्ष उमेदवार, नवीन चेहरा, विकासात्मक दृष्टिकोन, तरुण तडफदार नेतृत्व म्हणून उरण विधानसभा मतदारसंघातील जनतेने तेजस डाकी यांनाच पसंती दिली असल्याचे दिसून येते. दिवसेंदिवस तेजस डाकी यांना जनतेचा खूप मोठा पाठिंबा मिळत आहे.