रोहा (वार्ताहर) रोहे तालुक्यातील आदर्श गाव भातसई येथील वारकरी सांप्रदायिक सामाजिक क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रात विशेष ओळख असणारे परोपकारी सेवाभावी वृत्तीचे तुका म्हणे एका मरणेची सरे! उत्तमची उरे कीर्ती मागे!! या संत उक्तीप्रमाणे ह.भ.प.नथुराम जयराम पोळेकर भातसई यांचे शुक्रवार दिनांक१३ सप्टेंबर रोजी ७४वर्षीअल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.त्याचे शिक्षण जुनी अकरावी पर्यंत झाले.ते मेढा भात खरेदी सहकारी केंद्रात नोकरी केली . नंतर शेतकरी विविध सहकारी सोसायटी मध्ये मालाटे येथे नोकरी केली.तसेच मलेरिया सहकारी सेवा केली .त्यानंतर ते गरीबी हटाव मध्ये शिक्षक म्हणून नोकरी केली,पोळेकर गुरुजींनी अतिदुर्गम भागात नोकरी करत असताना त्या प्रत्येक ठिकाणी जिव्हाळा निर्माण केला.शिकक्ष म्हणून नोकरीला लागले हेडमास्तर, केंद्र प्रमुख, तालुका मास्तर म्हनून स्वहिच्या सेवा निवृत्त घेतली.
रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता.तसेच ते कबड्डी स्पर्धेचे समोलोच करत असत.
त्यांना सामाजिक कार्याची आवड वडीलापासून लागली होती.मुख्य प्रवर्तक महादेव म्हात्रे गुरुजी यांनी स्थापन केलेल्या गांवदेवी क्रीडा व.युवक मंडळ यांचेते खुप वर्षे संचालक होते त्या काळात आदर्श गाव भातसई योजने साठी त्याच मोलाचं योगदान दिले आहे. गांवदेवी क्रीडा व युवक मंडळने कबड्डी स्पर्धा आयोजित सुवर्ण महोत्सवी ५०वर्षोच्या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्यातील व्यवसायिक संघाचे निमंत्रित करण्यात आले होते.सेवानिवृत्त नंतर सुध्दा त्यांनी वारकरी संप्रदाय मेढाविभाग व शिक्षक सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करत होते.कुटल्याह पेन्शन धारकांना अडचण आली तर ते मदत करत असत.ते संघटनेचे कोणत्याही आंदोलन असले तर ते स्वतःच स्वतःला झोकून देत असत. इतर कुठल्याही संस्थांना जर अडचण येत असेल तर ते निस्वार्थी भावनेने मदत करत असत त्यांचे दसविधि कार्यक्रम रविवारी २२ सप्टेंबर रोजी भातसई येथे होणार आहेत.त्यांचे उत्तरकार्य तेरावे बुधवार २५ सप्टेंबर राहत्या घरी भातसई येथे होणार आहे.त्याच्या पच्छात तीन मुलगे सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्याच्या दुःखात कुणबी समाज रोहा तालुका, वारकरी संप्रदाय, सेवानिवृत्त शिक्षक संघटना,गांवदेवी क्रीडा व युवक मंडळ, आदर्श भातसई ग्रामस्थं दुःखात सहभागी आहोत.