रोहा (महेंद्र मोरे) रोहा रेल्वे स्थानकातून पनवेल दिशेकडे जाणारी मालगाडी अष्टमी फाटक क्रमांक 57 मध्येच त्यात बिघाड झाल्यामुळे बंद पडली.त्यामुळे रोहा येथून पनवेल कडे डॉ. जाधव नर्सिंग येथील एका अत्यवस्थ रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका जवळपास अर्धा तास अडकून राहिली होती. फाटकात उभी असलेली मालगाडी कधी सुरु होईल व फाटक उघडेळ या चिंतेने रुग्णवाहिकेतील नातेवाईकांच्या जीवाची घालमेल होत होती. समोर सायरन वाजवणारी रुग्णवाहीका, नेहमी प्रमाणे बेजबाबदार प्रशासन, अष्टमी नाका ते पडम पेपर मिल पर्यंत वाहतूक कोंडीत अडकेल्या नागरिकांचे मध्ये यामुळे संतापाची लाट निर्माण झाली होती. लोकसभा निवडणूक काळात फाटका जवळ उड्डाणपूल गर्डर टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झालेले पाहून आता लवकरच हे काम होणार असे मतदार राज्याला वाटत होते. मात्र मतदान झाल्यानंतर पुन्हा ते काम कासवगातीने सुरु आहे. डिसेंबर 2023 मध्ये पूर्ण होणारे या रेल्वे पुलाचे काम नक्की कधी पूर्ण होईल की याचा पण मुंबई गोवा महामार्ग होईल असा संतप्त सवाल रोजच्या व जीवावर बेतणाऱ्या खोळब्या मुळे त्रस्त स्थानिक नागरिकांचे मधून केला जात आहे.
रोहा शहर व तालुक्यात अशी कोणती समस्या नाही ज्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत नाही.शासकीय आरोग्य व्यवस्था आजही मृतावस्थेत,शहरात येणाऱ्या रस्त्यांची झालेली चालण,वारंवार खंडीत होणारा विजपुरवठा, बँका मध्ये परप्रांतीय अधिकारी कर्मचाऱ्यांकडून आपलेच पैसे काढताना होणारी हेळसांड ळ, भाजी, मटण मच्छी मार्केट मधील अस्वछता,बाजार पेठेतील फेरीवाल्यांचे रस्त्यावरील अतिक्रमण, आदी अनेक समस्यांचा रोहेकारांना रोज सामना करावा लागत आहे. कोकणातील सगळ्यात मोठा उत्सव आता सांगते कडे आला असतानाही याबाबत नियोजन करण्यात प्रशासन मात्र अपयशी ठरले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याच मालिकेत वारंवार बंद होणारे रेल्वे फाटक ही समस्या मात्र आता नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान एन गर्दीच्या वेळी रोहा रेल्वे स्टेशन मधून पनवेल कडे जाण्यासाठी एक मालगाडी मार्गस्थ झाली. मात्र ही गाडी रेल्वे फाटका मध्येच तिचे ब्रेक पाईप लिकेज असल्यामुळे बंद पडली.गाडीचे गार्ड यांनी पुन्हा संपूर्ण गाडीची तपासणी करत कुठे माल डब्या जवळ बिघाड झाला आहे ते शोधून काढले. यामध्ये अर्धा पाऊण तास गाडी रोहा नागोठणे रस्त्याच्या मधोमध उभी राहिल्या मुळे दोन्ही बाजूला प्रचंड वाहतूक कोंडी झाली. याच वाहतूक कोंडी मध्ये एक रुग्णवाहिका अडकून पडली होती.रोहा मधील प्रशासन हे फक्त विकास कामांची माहिती सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यासाठी जेवढे तत्पर असतें तसे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याची मानसिकता जनतेचा उद्रेक झाल्यावरच दाखवेल का? असा सवाल या रोजच्या फाटक बंद समस्ये मुळे सुजाण नागरिकांचे मधून होत आहे.
याबाबत रोहा रेल्वे स्थानक प्रबंधक अजय कुमार मीना यांचे जवळ अधिक माहितासाठी संपर्क साधला गाडीचे प्रेशर पाईप लिकेज असल्यामुळे ही घटना घडली.गाडी सुरु करण्याआधी ड्रायवर व गार्ड संपूर्ण गाडीची तपासणी करूनच गाडी पुढे काढतात.आज झालेल्या घटनेची माहिती वरिष्ठाना देत पुढील योग्य ती कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.