125 Views
रोहा ( रविंद्र कान्हेकर ) रोहा तालुक्यातील स्पंदन संस्था ही खुप जुनी सेवाभावी संस्था आहे. या संस्थेमार्फत दरवर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते. यावर्षी न्यू इंग्लिश स्कुल शेणवई व कोकबन हायस्कुल या ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. स्कुल बॅग, वह्या, पेण हे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी स्पंदन संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा अंबरे, सचिव प्रतीक राक्षे, श्रद्धा कोर्लेकर , राखी पाटील, सुविधा वाकडे, धनश्री पवार, मुख्याध्यापक रमेश दडवे, जाधव सर, मानसी उभारे वर्ग चार कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पंदनच्या अध्यक्षा स्नेहा अंबरे यांनी हा स्तुत्य उपक्रम शाळेत राबविल्याने मुख्याध्यापक दडवे सर यांनी त्यांचे आभार मानले.