महाराष्ट्र बिझनेस क्लब व दसबा फाऊंडेशन वतीन माजी आमदर अनिकेत तटकरे यांच्या हस्ते रोहयातील विविध व्यवसायिकांचा सन्मान

Share Now

71 Views

रोहा (सुहास खरीवले) रायगड तसेच रोहा तालुक्यातील विविध व्यवसायिक यांचा सन्मान महाराष्ट्र बिझनेस क्लब आणि दसबा फाऊंडेशन यांच्या वतीने माजी आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आला. रायगड जिल्हा तथा रोहा तालुक्यातील नामवंत बिझनेसमन आणि व्यवसायिक यांचा विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र बिझनेस क्लब व दसबा फाऊंडेशन यांच्या वतीने रविवारी १८ ऑगस्ट रोजी हा सन्मान सोहळा धाटाव येथील आर आय आर सी व्होल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. तर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्यरत असलेले कुटीर उद्योजक तथा व्यवसायिक यांचा विशेष सन्मान या संस्थेच्या माध्यमातून त्यांना व्यवसायिक यांना युवा बिझनेस पुणे “गरुड झेप स्वप्नांच्या दिशेने”यावर विशेष मार्गदर्शन सुप्रसिद्ध बिझनेस कोच विजय कोटगोंड यांचे विशेष मौलिक मार्गदर्शन लाभले व तद्नंतर प्रमुख मान्यवर युवकांचे प्रेरणास्थान माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते नामांकित व्यवसायिकांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रगत शेती व्यवसाय, प्लंबिग, सुतार, कन्स्ट्र्शन, कटलरी,सायकल मार्ट, पेंटिग, खडी केशर विट भट्टी,कॅट्रेक्स,फार्म हाऊस, हॉटेल व्यवसायिक, वॉटर हार्वेस्टिंग, आशा विविध क्षेत्रात अग्रेसर असलेले व्यवसायिक यांचा विशेष सन्मान या कार्यक्रमात या संस्थेच्या माध्यमातून तसेच अनिकेत भाई तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रसंगी अर्जुन गोरीवले, नरेंद्रशेठ जाधव,मंगेश भोईर, जितेंद्र गिजे, गीतराज म्हस्के, धर्मराज माने, अशोक कोतवाल, सुमित गोपिलकर, रामचंद्र नाकती, सखाराम बर्जे, अनंत मगर, नितीन बामुगडे, नारायण भोसले, नारायण कान्हेकर, नामदेव म्हसकर, राजेश कदम, निवास पवार, अभिषेक गोतावडे, अक्षता शिंदे, रुचिका जैन, विजय जाधव, मनीष खिरीट, गणेश भोकटे पराग मोरे,सह पंचिविसहून अधिक येथील व्यवसायिकांना सन्मानीत करण्यात.

यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे, पी पी बारदेस्कर, विजयराव मोरे , सुरेश मगर, शंकर भगत, रामचंद्र सकपाळ, महाराष्ट्र बिझनेस कोच विजय कोटगोंड, मुख्य समन्वयक योगेश kdvekr, अनिल भगत, ज्ञानेश्वर साळुंखे, मिलिंद आष्टीवकर, अमित घाग, सुहास खरीवले, प्रदीप बामुगडे, अमित मोहिते, सुनील ठाकूर, गजानन बामणे, गुणाजी पोटफोडे, रविंद्र मरवडे,सह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच आधी सन्मानित करणारे व्यावसायिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश भगत यांनी केले तर प्रास्ताविक दसबा फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महेश बामुगडे यांनी केले तर उपस्थित प्रमूख पाहुणे लाभलेले उद्योजक पि पि बारदेसकर आणि युवकांचे प्रेरणास्थान माजी आमदार अनिकेत भाई तटकरे यांनी व्यवसायिकांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र बिझनेस क्लब व दसबा फाऊंडेशन च्या सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *