रोहा (सुहास खरिवले) कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, ग्रामिण शाखा रोहा विभागीय मेढा ग्रुप तर्फे येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव व सत्कार सोहळा तसेच कुणबी समाज बांधव यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे समाज बांधव यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहत पार पडला.
प्रसंगी या सोहळ्यात चंद्रकांत कृष्णा मोरे यांची महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा उपसचिव मंत्रालय, शरद पांडुरंग लाड मॅनेजिंग डायरेक्टर, हेमंत नामदेव मोहिते मॅनेजर, नितीन मुरलीधर ठमके मॅनेजर, सौरभ जयराम खांडेकर अभियंता जि.प.रायगड, विलास वसंत महाले मॅनेजर, शुभम ज्ञानेश्वर खरीवले युट्यूब सेलिब्रिटी, सोहम विनायक गोवर्धने चर्टर अकाउंटंट (सि ए), सिध्दी अनिल खरीवले (सि ए) यांचा तसेच दहावी, बारावी, पदवीधर विद्यार्थ्यांसह गुणवंत खेळाडू तसेच विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविकेल्या समाज बांधव यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ओबीसी जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश मगर,कुणबी समाज रोहा तालुकाअध्यक्ष रामचंद्र सकपाळ, जिल्हा सल्लागार शिवराम शिंदे, चिटणीस सतिश भगत यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यावरांचे स्वागत मेढा ग्रुप च्या वतीने करण्यात आले.तर उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते विध्यार्थीचा सत्कार व सुरेश मगर रायगड जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष,रामचंद्र सकपाळ, शिवराम शिंदे, अनंत थिटे, सतिश भगत, रोहा तालुका कुणबी समाज उपध्याक्ष रघुनाथ करंजे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.
यावेळी रोहा तालुका कुणबी समाजाचे माजी अध्यक्ष शिवराम शिंदे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की ग्रुप अध्यक्ष निवास खरीवले यांनी सर्व जेष्ठ व तरुण यांना एकत्र करून ग्रुपची बांधनी यशस्वी केल्याबदल त्याचे अभिनंदन केले.तसेच मारुती खरीवले यांनी आपले विचार व्यक्त करताना मेढा ग्रुपच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.यानतंर सुरेश मगर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की मेढा विभाग हा तालुक्यात एक नंबरचा होता.जसे चणेरा,धाटाव, विभाग आहे त्याच प्रमाणे पुन्हा यशस्वी पणे काम करताना दिसत असल्याचा आनंद व्यक्त केला. सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन छ शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुणबी समाज मेढा ग्रुप ने अथक परिश्रम घेतले.