रोहा :-(उद्धव आव्हाड )उपरोक्त संदर्भीय रायगड जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची स्थापना करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी पुरवठा अधिकारी व शासकीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी अलिबाग कलेक्टर ऑफिस राजभवन हॉलमध्ये नवनियुक्त सदस्यांना मार्गदर्शन करण्याकरिता बैठक आयोजित करण्यात आली होती
रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे,पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे,दीपक मुळे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय व अशासकीय जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली त्या सर्व सदस्यांना मार्गदर्शन व ग्राहकांच्या समस्या व प्रश्न शासनापर्यंत पोहोचण्यासाठी व त्यावर करावयाच्या उपाययोजनांसाठी शासनास सल्ला देण्यासाठी स्थापना करण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण समिती परिषदेची बैठक अतिशय प्रसन्न व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली
सदर बैठकीत जिल्हाधिकारी किशन जावळे साहेबांनी उपस्थित सर्व शासकीय व अशासकीय सदस्यांना मार्गदर्शन करत आपल्या मर्यादा व कर्तव्य याची जाणीव करून देत ग्राहकांना जास्तीत जास्त शेवटच्या घटकापर्यंत कसे न्याय मिळवून देता येईल त्यांच्या समस्या व फसवणुकीपासून कसे वाचवता येईल यासाठी तत्पर राहण्यासाठी अहवाल केले
ह्या बैठकीस शासकीय सदस्य माननीय पोलीस अधीक्षक, माननीय अप्पर जिल्हाधिकारी उपनियंत्रक वैद्यमापन शास्त्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद सहाय्यक उपायुक्त अन्न व औषध प्रशासन पेण ,कार्यकारी अभियंता दूरसंचार विभाग कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी,जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी रायगड सहाय्यक व अशासकीय सदस्य विजय बोरकर,वसंत नाईक,गणेश भोईर,दिलीप पांचाळ, नामदेव शिंदे,चंद्रकांत पाटील, विनायक तेलंगे,रश्मी रोडेकर,संतोष म्हामुनकर, उद्धव आव्हाड,डॉक्टर नूतन कामेकर,डॉक्टर फरीद चिमावकर, प्रशांत हिंगणे,वनिता धामापूरकर, दत्ताराम कदम,राजेश अंधारे, गोरखनाथ पाटील उपस्थित होते. यावेळी ही मीटिंग संपन्न करण्यासाठी विशेष मेहनत जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव, सोनवणे दीपक मुळे व सहकार्यांनी घेतली.