बुद्धिबळ स्पर्धेत रिलायन्स फाउंडेशन स्कुलची बाजी, रोहा तालुका बुद्धिबळ स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Share Now

95 Views

रोहा ( रविंद्र कान्हेकर ) रोहा तालुक्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी बुद्धिबळ स्पर्धेत आपला सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत सर्वच शाळांतील विद्यार्थ्यांनी चांगला खेळ केला. जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र हातनूर, क्रीडा अधिकारी सचिन निकम व रोहा तालुका क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धाना मान्यता देण्यात आली. बुद्धिबळ स्पर्धेत रिलायन्स फाउंडेशन स्कुलने जास्तीचे प्रमाणपत्र घेत बाजी मारली. तालुक्यातील जे. एम. राठी हायस्कुलमध्ये या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. यावेळी जे. एम. राठी स्कुलच्या मुख्याध्यापिका लीना डेविड, तालुका समन्वयक रविंद्र कान्हेकर, क्रीडा शिक्षक सुधीर जंगम, धनंजय महाडिक, जितेंद्र म्हात्रे, समिता वाघमारे, प्रशांत देशमुख, राकेश म्हसकर, गोविंद कवलगे, शिवाजी मेंढे, सुनील घोलप, नरेश महाडिक, बुद्धिबळ पंच विलास म्हात्रे, सुशील गुरव आदींसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जे. एम. राठी स्कुलच्या मुख्याध्यापिका लीना डेविड यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ देण्यात आली. रोहा तालुका बुद्धिबळ स्पर्धेत डॉ, सी. डी. देशमुख रोहा, के. ई एस मेहंदळे रोहा, जे. एम. राठी, एम. डी. एन कोलाड, श्रीमती गीता द. तटकरे, एम. पी. एस. एस कोलाड, द. ग. तटकरे कोलाड, गु. रा. अग्रवाल नागोठणे, के. ई. एस.व्ही. पी. टी इंग्लिश स्कुल, ग्रेगोरियन पब्लिक स्कुल, रिलायन्स पेट्रोकेमिकल स्कुल नागोठणे, जिंदाल माऊंट लिटेरा स्कुल आदर्श माध्यमिक विद्यालय कुडली, एम. बी. मोरे फाउंडेशन स्कुल सहभागी झाले. १४, १७ व १९ वर्ष वयोगटातील १६९ विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्व विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

अंतिम निकाल
१४वर्षे मुलांमध्ये प्रथम क्रमांक सिद्धार्थ शशिकांत चौगुले, द्वितीय विश्वास नितीन दांगडे, तृतीय अर्णव सलागरे, चतुर्थ दिव्यांशू द्विवेदी, पंचम अर्णव झोलगे, १४वर्षे मुली प्रथम अक्षदा मोरे, द्वितीय अक्षरा मोरे, तृतीय ऋतिका पाटील, चतुर्थ अस्मि कुर्ले, पंचम कार्तिकी बेडेकर,

१७वर्ष मुले प्रथम आनंद जाधव, द्वितीय युवराज पाटील, तृतीय आयुष सोमन, चतुर्थ आयुष पाटील, पंचम तन्मय केंगळे,१७वर्ष मुली प्रथम गार्गी दिवेकर, द्वितीय तनिष्का जंजीरकर, तृतीय तनिष्का पाटील, चतुर्थ संचिता आढाव, पंचम श्रेया जगताप,

१९वर्ष मुले प्रथम सुमित महाडिक, द्वितीय रुपेश प्रसाद, तृतीय आश्रय गावित, चतुर्थ सृजन वडवेराव, पंचम आदेश कोळी, १९वर्ष मुली प्रथम मनस्वी शहापूरकर, द्वितीय गौरी गणाचारी, तृतीय अंजली महतो, चतुर्थ सृष्टी भोय, पंचम अनुश्री शुक्ला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *