उरण (विठ्ठल ममताबादे) : रक्तदान श्रेष्ठदान, रक्तदान सेवा हीच ईश्वराची सेवा असे ध्येय उराशी बाळगून, गोरगरिबांना मदत करण्याच्या दृष्टीकोनातून व रक्ताच्या अभावी कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये. गरजू व्यक्तींना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे या अनुषंगाने स्वर्गीय अश्विन पाटील मित्र परिवार तर्फे व श्री साई ब्लड बँक पनवेल यांच्या सहकार्याने उरणमधील स्वर्गीय अश्विन रमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दि. ३० जुलै २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत उरण शहरातील बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, देऊळवाडी,विमला तलाव येथे क्रीडा संकुल मधील टेरेस वर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी एकूण १०४ जणांनी रक्तदान केले. यावेळी सनशाईन हॉस्पिटल आणि सेंटर फोर साईट यांच्या सहकार्याने डोळे तपासणी व सनशाईन हॉस्पिटल नेरुळ तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डोळे तपासणी शिबीर व आरोग्य शिबिराचा नागरिकांनी मोठया प्रमाणात लाभ घेतला. आयोजित केलेल्या रक्तदानालाही जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला. या वेळी श्री साई ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी निलेश पाटील, डॉ योगेश पाटील, टेक्निशियन ऋतुजा पाटील, टेक्निकल सुपरवायजर ललित पाटील व इतर कर्मचारी, सेंटर फॉर साईट नेरुळचे मॅनेजर शेखर वाघमारे, असिस्टंट ज्योती आठवले, ओपथम- ऐश्वर्या पवार,सनशाईन हॉस्पिटल नेरुळचे ऍडमिन मुसरत बडे, आरएमओ – डॉ जान्हवी ठाकूर,सिस्टर – दीपिका नाटेकर तसेच अश्विन पाटील मित्र परिवाराचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या सर्वांनी विशेष मेहनत घेतली.
अश्विन पाटील मित्र परिवारातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात १०४ जणांनी केले रक्तदान
136 Views