पौष्टिक रानभाजीची ओळख होण्याच्या दृष्टीने महोत्सवाला अनन्यसाधारण महत्व ; ना आदिती तटकरे, जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद

Share Now

233 Views

रोहा (प्रतिनिधी) लहानपणी काही रानभाजी नावडती होती. अनेक लहानग्यांना भाजी आवडत नाही. पण रानभाज्यांचे आहारातील महत्त्व समजल्यानंतर रानभाजी आवडत्या झाल्या. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी पालेभाजीचा आहारात समावेश गरजेचा आहे. तरीही रानभाजी कशी बनविली जाते, भाजी बनविण्याच्या चवीवरही आवड निर्माण होते. मुलांसाठी फास्टफूड चांगले नाही. पालेभाज्या, रानभाज्यांची मुलांना सवय लावा, रानभाजी आवडीनिवडीच्या गंमती सांगत आहारात रानभाज्यांचे प्रचंड महत्त्व आहे, हे महत्त्व समजून घेतले पाहिजेत. पौष्टिक रानभाजीची ओळख होण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे असे प्रतिपादन ना आदित्य तटकरे यांनी केले. वरसे येथील ग्रामपंचायत सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव २०२४ उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

वरसे (रोहा) येथे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा, विवेकानंद रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरात रानभाजी महोत्सवाचे गुरुवारी १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे उद्घाटन ना आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी तटकरे यांनी रानभाजी प्रदर्शनाची पाहणी करून अनेक रानभाज्या प्रदर्शन महिला बचत गट, रेसिपीची माहिती घेऊन सहभागी महिलांचे कौतुक केले. प्रदर्शनात हेलोंडा, दिंडी यांसह अनेक दुर्मिळ पण महत्त्वाच्या रानभाजी, नाचणी, भाजीची बर्फी, बिस्किट व अन्य भाजी प्रदर्शनात पाहायला मिळाल्या. व्यासपीठावर कृषी अधिक्षक कैलास वानखेडे, आत्मा प्रकल्प संचालक सतीश बोराडे प्रकल्प उपसंचालक शिवाजी भांडवलकर, उपविभागीय कृषी अधिकारी रविशंकर कावळे, प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार किशोर देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी रविशंकर कावळे, गटविकास अधिकारी शुभदा पाटील, कृषी अधिकारी महादेव करे, विवेकानंद संस्थेचे सुनील रुळेकर, सरपंच अमित मोहिते व मान्यवर उपस्थित होते. प्रकल्प संचालक सतीश बोराडे यांनी प्रास्ताविकात महोत्सवाचा उद्देश, रानभाजीचे महत्त्व विविध योजनांची माहिती विषेद केली. ना अदिती तटकरे यांनी उपस्थित शेतकरी, महिला बचत गट, प्रदर्शनास सहभागीना मार्मिक मार्गदर्शन केले. आहारातील रानभाजींचे महत्त्व सांगताना लहानपणी मलाही भाजी आवडत नव्हती. नंतर भाजीचे महत्त्व कळाले आणि रानभाजी आवडू लागली, हा किस्सा सांगत भाजी कशी बनवली जाते, त्या चवीवर खूप काही अवलंबून असते असे तटकरे यांनी सांगितले. महिला सक्षमीकरण, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसह अन्य योजनेची माहिती ना. तटकरे यावेळी उपस्थितांना दिली. महोत्सववात तळा कृषी अधिकारी अनंत कांबळे यांनी बांबू मिशन, बांबू लागवड योजना यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाला शेतकरी, नागरिकांनी मोठी गर्दी करत भरभरून प्रतिसाद दिला. विविध शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला शेतकरी यांनी सहभाग घेतला, महोत्सव यशस्वी करण्यासाठी रोहा तालुका कृषी विभाग, विविध कंपनी संस्था प्रतिनिधी, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *