धाटाव (प्रतिनिधी) मुख्यतः ग्रामीण भागातील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या ऋणात कायम राहावे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शालेय कामकाज सुरू आहे. दुर्गम भागातील शाळा, विद्यालयांना विविध अडचणी असतात. विद्यालयात शिक्षण घेणारी मुले श्रमिक कष्टकरी वर्गातील आहेत. त्यामुळे शाळा, विद्यालय व सामान्य विद्यार्थ्यांना नेहमीच पाठबळाची गरज असते विविधता गरज माजी विद्यार्थ्यांनी पूर्ण करावी, असेच जाणीवेचे काम विद्यालयाचे माजी विद्यार्थी जितेंद्र जाधव यांनी पूर्ण केली असे गौरोद्गार पत्रकार राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केले. दरम्यान, वरदायिनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पत्रकारांनी ग्रामीण भागातील शालेय मुलांशी मार्गदर्शनपर संवाद साधला. त्यातून मुलांनी आनंद व्यक्त केला.
तळा तालुक्यातील वरदायिनी विद्यालय महागावचे माजी विद्यार्थी जितेंद्र जाधव यांनी सहयोगी माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. शुक्रवारी आयोजित वरदायिनी विद्यालयातील विद्यार्थी संवाद कार्यक्रमाला महुरे येथील सामाजिक कार्यकर्ते जयवंत जाधव, पत्रकार राजेंद्र जाधव, रवींद्र कान्हेकर, उध्दव आव्हाड, पोलीस संघटनेचे माजी पदाधिकारी कमलाकर मांगले, मुख्याध्यापक तुकाराम व्यवहारे, व शिक्षक वृंद उपस्थित होते. ज्या गावात आपले बालपण गेले, ज्या शाळेत शिकतो, त्या शाळेला कधीच विसरता कामा नयेत. अधिक दुर्गम भागातील विद्यालये विविध अडचणीत असतात. सामान्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, पाठबळाची गरज असते. ती गरज, सामाजिक बांधिलकी माजी विद्यार्थ्यांनी जोपासली पाहिजे. वरदायिनी विद्यार्थ्यांमध्ये माजी विद्यार्थी जितेंद्र जाधव यांनी ही जाणीव ठेवत विद्यार्थ्यांना परिपूर्ण शैक्षणिक साहित्य दिले हे कौतुकास्पद आहे. असे सांगत राजेंद्र जाधव यांनी मुलांशी हसत खेळत संवाद साधला. विद्यार्थी, विद्यालयाला सहकार्य करू असेही जाधव यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक तुकाराम व्यवहारे यांनी मान्यवरांचे आभार मानले.