उरण ( विठ्ठल ममताबादे ) भारतीय मजदूर संघाचे आजचे वैभव अनेकांच्या त्याग आणि बलदानामुळेच उभे आहे. जगातील कामगार विश्वातील अनेक जण भारतीय मजूर संघाच्या कामाने प्रभावित असून जगभरातील अनेक कामगार नेते भारतीय मजूर संघाचे मार्गदर्शन घेत आहेत. त्यांच्या देशात मार्गदर्शन करण्यासाठी संघाच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करीत आहेत. ही अभिमानास्पद बाब आहे. हा गौरव, हा अभिमान आपल्याला प्राप्त झाला आहे.हे फक्त अनेक कार्यकर्त्यांचा त्याग आणि बलिदानामुळेच आहे असे विचार कामगार नेते तथा भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर संघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधीर घरत यांनी भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्य कारिणीच्या बैठकीवेळी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.”बी एम एस की पहचान त्याग तपस्या और बलिदान” या घोषवाक्य बद्दल विस्तृत मार्गदर्शन करताना अनेकांच्या त्याग व बलिदाना बद्दल सुधीर घरत यांनी माहिती दिली.
भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघाचे दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारीणी सभा हलदीया पोर्ट, पश्चिम बंगाल येथे १३,१४ जुलै २०२४ रोजी संपन्न झाली. या कार्यकारिणीच्या उदघाटन प्रसंगी पश्चिम बंगाल भारतीय मजदूर संघाचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप कुमार बिजाली, जनरल सेक्रेटरी देवाशिष भट्टाचार्य, चंद्रकांत (अण्णा) धुमाळ, पोर्ट महासंघाचे महामंत्री सुरेश पाटील,कोषाध्यक्ष सुधीर घरत, अध्यक्ष श्रीकांत राय व देशभरातील महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.या दोन दिवसीय कार्यकारणी मीटिंगमध्ये कामगारांच्या समस्यावर चर्चा करून भविष्यात येणारी आव्हाने काय असतील व त्यांना कसे सामोरे जायचे याबाबत रणनीती तयार करण्यात आली.कामगार नेते तथा महासंघाचे महामंत्री सुरेश पाटील यांनी भारतीय मजूर संघाला विविध बंदरात ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांसाठी येणाऱ्या काळात जास्त काम करावे लागेल असे मत व्यक्त केले