रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा नवीन शेवा येथे राबविण्यात आला नावीण्यपूर्ण उपक्रम

Share Now

104 Views

उरण (विठ्ठल ममताबादे) रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा नवीन शेवा येथे Eco clubs for Mission Life या उपक्रमा अंतर्गत दिनांक १/७/२०२४ ते दिनांक ८/७/२०२४ पर्यंत वेगवेगळ्या थीमवर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. पर्यावरण पूरक या उपक्रमात पहिल्या दिवशी आरोग्यदायी जीवन शैली स्वीकारणे या थीमवर आधारित वृक्षारोपण व वृक्ष लागवड हे उपक्रम राबविण्यात आले तसेच दुसऱ्या दिवशी शाश्वत अन्नप्रक्रिया स्वीकारणे या उपक्रमांतर्गत भरड धान्य स्पर्धा व परसबाग तयार करणे हा उपक्रम राबविण्यात आला. तिसऱ्या दिवशी ई -कचरा कमी करणे या उपक्रमा अंतर्गत ई -कचऱ्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक ही. सो. म्हात्रे, तसेच उपशिक्षक प्रवीण म्हात्रे यांनी खूप छान असे माहिती दिली.

उपक्रमाच्या चौथ्या दिवशी कचरा कमी करणे या उपक्रमांतर्गत कचऱ्यापासून कलाकृती निर्मिती इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी केली. पाचव्या दिवशी ऊर्जा बचत या उपक्रमांतर्गत ऊर्जा संवर्धनावर पोस्टर आणि चित्रकला इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी केले. त्यांना मार्गदर्शन मोहिनी पाटील, अर्चना ठाकूर आणि चैताली म्हात्रे यांनी केले. उपक्रमाच्या सहाव्या दिवशी पाणी बचत करणे या उपक्रमांतर्गत पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना शिवप्रसाद पंडित यांनी छान मार्गदर्शन केले. उपक्रमाच्या सहाव्या दिवशी प्लास्टिकचा वापर टाळणे यावर इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर मेकिंग, प्लास्टिक वापर टाळणे यावर आधारित प्रतिज्ञा आणि घोषवाक्य सादर केली.

उपक्रमाच्या आठव्या दिवशी ट्री ऍक्टिव्हिटी या उपक्रमांतर्गत इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण अंतर्गत झेंडूच्या रोपांची लागवड केली त्याचप्रमाणे घोषवाक्य आणि गीत गायन केले त्यांना मार्गदर्शन शर्मिला गावंड यांनी केले. अशाप्रकारे मुख्याध्यापक म्हात्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळवून हा उपक्रम यशस्वीरितेने पूर्ण केला त्यानिमित्ताने गावच्या सरपंच सोनलताई घरत आणि सदस्यांनी सर्वांचे कौतुक केले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच माता पालक गटातील सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले नवीन शेवे केंद्राचे केंद्रप्रमुख म. का. म्हात्रे यांनी देखील सर्वांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *