रोहा (वार्ताहर) कुणबी समजोन्नोती संघ मुबंई ग्रामीण शाखा रोहा तालुका स्तरावर चणेरा विभाग, धाटाव विभाग,कोलाड विभाग,ऐनघर विभाग, नागोठणे विभाग,सोनगाव विभाग, मेढा विभाग, खांब विभाग कुणबी समाज ग्रुप अध्यक्ष व कार्यकरणी उपस्थित होते. यावेळी समाज नेते व शिक्षण महर्षी कै. रामचंद्र पोटफोडे (मास्तर) शिरवली, धामणसई पंचक्रोशी वारकरी संप्रदायाचे संस्थापक व समाजाचे मार्गदर्शक कै रघुनाथ होणाजी भोकटे गावठाण व इतर ज्ञात अज्ञात सामाजिक बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सरचिटणीस श्री सतिश भगत यांनी उपस्थित समाज पदाधिकारी व समाज बांधव यांचे स्वागत केले.
रोहा तालुका कुणबी समाज अध्यक्ष रामचंद्र सकपाळ यांनी मार्गदर्शन करतांना समाज मंदिर विषय असलेल्या अडचणी मार्ग कसा काढण्यात आला हे सांगितले तसेच मा.खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या कडे जातीच्या दाखवल्या संदर्भात जे निवेदन दिले आहे त्यासाठी लवकरच मुख्यमंत्री सोबत मिटिंग घेण्यात येईल असे मिटिंग मध्ये माहिती दिली. यावेळी समाज नेते शंकरराव म्हसकर यांनी मागील मुख्यमंत्री मा. देवेद्रजी फडणवीस साहेब यांच्या सोबत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त व आताचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांना दिलेले निवेदन दिले आहे याची माहिती दिली. कुणबी समाज उपध्याक्ष आनंता थिटे यांनी मा.खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या सोबत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त सांगितले .यावेळी निवास खरीवले यांनी मुलांना शिक्षण ॲडमिशन घेतेवेळी येणाऱ्या अडचणींवर लवकरच मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत मांडले. महेश ठाकुर यांनी निवेदन देऊन जर काही उत्तर दिले जात नसेल तर रस्त्यावर उतरल्या शिवाय पर्याय नाही असे मत मांडले. सतीश भगत कुणबी समाज रोहा सेक्रेटरी, महेश बामुगडे, शशिकांत कडु,गुणाजी पोटफोडे, ज्ञानेश्वर दळवी,संदेश लोखंडे, दत्ताराम झोलगे, आगले सर, राजेश कदम,या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर मिटिंग मध्ये जातीचा दाखला, युवक व महिला कमेटी तालुका व विभागवार निवड करणे, समाजाच्या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी आदर्श नियमावली, समाज संघटित होण्यासाठी विविध उपक्रम घेणे, विभागवार बैठका घेणे अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. मिटिंग करिता समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.