रोहा ( सुहास खरीवले ) मित्सु केम प्लास्ट लि., तळवली, ही कंपनी खालापूर येथे ३ वर्षांपासून कार्यरत आहे. सप्टेंबर २०२३ पासून कामगारांनी जनरल मजदूर सभेचे नेतृत्व स्विकारले आहे. कामगारांच्या सर्वसाधारण मागण्याबाबतचे पहिले अॅग्रीमेंट करण्यात जनरल सेक्रेटरी संजय वढावकर यांना यश आले आहे. या करारामुळे कामगारांना ५,०००/- ते ६,०००/- वेतनवाढ, दुप्पट ओव्हरटाईम, सुट्टीचे रोख पैसे, महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार स्पेशल डी. ए., फॅक्टरी अॅक्टनुसार पी.एल., ११ दिवस सणांची रजा, ८ दिवस किरकोळ रजा, ८ दिवस आजारपणाची रजा व इतर सवलती मिळणार आहेत. तसेच कामगारांच्या मागणीनुसार सुट्टीचे रोख पैसे व इतर लाभ देऊन तीन वर्षाचा पगारवाढीचा करार संपन्न झाला आहे. या करारावर संघटनेच्या अध्यक्षा संज्योत वढावकर, सरचिटणीस संजय वढावकर, शामकांत जोशी, सेक्रेटरी जगदीश उपाध्याय तसेच कंपनीचे डायरेक्टर जगदीशभाई देढीया व कमिटी मेंबर्स यांनी स्वाक्षरी केल्या. या करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशी माहिती संघटनेचे खजिनदार प्रशांत शेट्ये यांनी कळविली आहे.
जनरल मजदूर सभेचे सरचिटणीस संजय वढावकर यांच्या नेतृत्वाखाली मित्सु केम प्लास्ट लि., तळवली, खालापूर येथील कामगारांचा भरघोस पगारवाढीचा करार नुकताच पार पडला
146 Views