रोहा (वार्ताहर) रोहा लालुक्यातील बँकिंग क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जय भवानी सहकारी पतसंस्थेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग सरफळे रावसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी समाज भवन रोहा येथे रविवारी ११ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात संस्थेने जे कामकाज केले त्याचा संपूर्ण अहवाल उपस्थित सभासदांसमोर यावेळी मांडण्यात आला.तसेच आयोजित सभेत विशेष ठराव सर्वानुमते मंजूर करत पथ संस्थेचे सभासद् दारांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक इयत्ता १० वी, १२ वी तसेच पदवी प्राप्त त्याच बरोबर उच्च तंत्र पदविका परीक्षेत प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव संस्थेच्या वतीने तसेच संचालक मंडळाच्या वतीने यावेळी उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
मोठया उत्साही वातावरणात संपन्न झालेल्या सर्व साधारण सभेस यावेळी मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष शंकर भगत, सचिव सुहास खरीवले, संचालक मनोहर मेहतर, सुनील ठाकूर, जगदीश दामाणी, महेश बामुगडे, दिपक जाधव, किशोर सकपाळ, हेमंत राणे, संदीप सरफळे, सौ.सुलभा पवार, शर्वरी जाधव, अंकुश वाघमारे,सह संचालक तसेच आदी सर्व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष सरफळे रावसाहेब यांनी संचालक मंडळ, सदस्य व सभासद यांचा पतसंस्थेबद्दलचा विश्वास व सहकार्य यामुळे आज संस्थेचा नवलौकिक वाढलेला आहे, हे सर्वांना अभिमानास्पद आहे. संस्थेची अशीच प्रगती वाढावी यासाठी सर्वांनी संस्थेमध्ये बचत खाते उघडून आपल्या उत्पन्नातील काही भाग त्या खात्यामध्ये गुंतवावा. आयुष्यात स्थैर्य व यश मिळवण्यासाठी आर्थिक बचत करणे हे महत्त्वाचे आहे असे सांगितले.
प्रसंगी यावेळी सभेची सुरुवात दीप प्रज्वलन गणेश प्रतिमा पूजन तसेच शिव छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली तत्पूर्वी देशपातळीवरील शहीद झालेले जवान तसेच सभासदांचे नातेवाईक,सामाजिक, राजकीय,सहकार,शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या व्यक्ती पंचतत्वात विलीन झाल्या त्यांच्या स्मूर्तीस अभिवादन करत श्रद्धांजली अर्पण करुन सुरुवात करण्यात आली.
रोहा येथे गेली 29 वर्ष जय भवानी ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्यादित ही संस्था कार्यरत असून तिची उलाढाल ही चार कोटी रुपयांची तरतूदित पोहचली असल्याने खातेदार तसेच कर्जदार हे वेळेवर व्यवहार करत असल्याने एकणून कर्ज वसुलीत ९८.६० टक्के आहे त्यामुळे सभासदांनी सर्व संचालकांचे यावेळी अभिनंदन केले.तसेच सभेचे इतिवृत्त सचिव सुहास खरीवले यांनी वाचन केले तर संचालक मनोहर मेहत्तर यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले तसेच वार्षिक नफा आणि तोटा याचे सौ.निता शिगृत लिपिक वाचण केले, तसेच सभासदांना प्रश्न उत्तरे सौ.बंदिनी धनावडे मॅनेजर यांनी केले तर सभेचे सूत्रसंचालन संचालक महेश बामुगडे यांनी करत सभेची सांगता आभाराने व अल्पोपहार याने करण्यात आली.