रोहा ( महेंद्र मोरे ) राज्यात विधानसभा निवडणु्कांची घोषणा १५ ऑक्टोंबर रोजी होत आदर्श आचारसंहिता ही लागू झाली आहे. २२ तारखेला या संदर्भात अधिसूचना निघाल्या नंतर उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया सुरु झाल्यानंतर आचार संहिता अंमलबजावणी सुरु होते. याचा फायदा घेत रोहा तालुक्यातील देशी विदेशी मद्द विक्री दुकानातून आचार संहिता घोषणा होताच मोठया प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरु झाल्याचे दिसत आहे.
परवाना धारक परमिट रूमला वेळेचे बंधन येणार असल्याचे हेरून निवडणूक काळात प्रचार करणारे कार्यकर्ते व मतदार यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी शहरासह ग्रामीण भागातील धाबे, चायनीज सेंटर यांची तयारीची लगबग वाढलेली दिसत आहे. रोहा शहरा बाहेर चोहोबाजूला आधीपासूनच अवैध देशी, विदेशी मध्य ड्राय डे व अन्य दिवशी विनासायास उपलब्ध होते. ग्रामीण भागात ही बिन दिक्कत हे सर्व गोरख धंदे राजरोस होत आहेत. मात्र आता निवडणूक आचार संहिता लागली असतानाही रोहा उत्पादन शुल्क विभाग नेहमी प्रमाणे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणूक शांतमय व प्रलोभनमुक्त वातावरणात व्हावी यासाठी मा. जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क रायगड जिल्हा अधीक्षक यांनी वेळीच यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणे गरजेचे असल्याची मागणी चोहोबाजूंनी झाली आहे.