रोहा ( दिपक भगत ) रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील साधना नायट्रो केम कंपनीतून मागील वर्षभरापासून सातत्याने रासायनिक जल प्रदूषण होत असल्याची घटना वारंवार निदर्शनास येत आहे. धाटाव येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष भोकटे यांनी मागील वर्षभरापासून हे रासायनिक पाणी आटोक्यात याव यासाठी स्थानिक कंपनी प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ उपविभाग तसेच एम. आय. डी. सी रोहा उपविभाग यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार केला होता. परंतु या पत्रव्यवहाराची ना कंपनी प्रशासनाने दखल घेतली ना प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दाखल आजही रासायनिक जलप्रदूषणाची परिस्थिती आहे तशीच पहावयास मिळते. अशा बेपरवा वागणाऱ्या कंपन्यांवर आता कोणाचं अंकुश राहिलेला नाही. हम करे सो कायदा. अशी मगरूरी या कंपन्यांची चाललेली आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि मुजोर साधना कंपनी यांचा साठलोट तर नाही ना अशी चर्चा आता नागरिकांमध्ये रंगू लागलेली आहे
साधना कंपनीची संरक्षण भिंत हि जीर्ण झाल्याची बाब २८/०८/२०२३ रोजी संतोष भोकटे यांनी दक्षता आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष रोहा तालुका यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी पत्र व्यवहार केला होता. परंतु त्या पत्रव्यवहाराला देखील केराची टोपली दाखवण्याचा काम प्रशासन केलेला आहे. साधना कंपनीची जीर्ण झालेली भिंत कोसळून जरी जीवित हनी झालेली नसली तरी तिच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. आज क्रीडाप्रेमीसाठी उपलब्ध असलेल्या क्रीडा संकुलनमध्ये कंपनीच्या आवरातून येत असताना रासायनिक पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे हे आता लपून राहिलेलं नाही. तसेच तेथे वावरणाऱ्या इतर वन्यजीवांच्या आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. आता तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने व इतर संबंधित विभागाने कंपनीच्या या गलथान कारभारावर काहीतरी कडक कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरून लागलेली आहे. एका कंपनीमध्ये दुर्घटना घडल्यानंतर सर्व प्रशासन जसे तत्परतेने धाव घेत आपण किती कर्तव्यदक्ष आहोत हे दाखवून देण्याचा खटाटोप करतात तर मग पूर्वकल्पना देऊन देखील प्रशासन हालचाली करणार नसेल तर यामध्ये दोष नेमका द्यायचा कोणाला? की फक्त कंपनी दुर्घटना घडल्यानंतर आपण किती सतर्क आहोत हे दाखवून देण्याचे काम फक्त काही प्रशासकीय मंडळी करतात का ? एकंदरीत या सर्व प्रकारावरून असं दिसून येतंय की, साधना कंपनीच्या मनमानी कारभाराला पाठीशी घालनारे कोणते तरी खंबीर हात असणार असा संशय काही नागरिकांनी बोलून दाखवला. कंपनीत जर का अशीच परिस्तिथी राहणार असेल तर येत्या काळात तीव्र आंदोलन कंपनीच्या व संबंधित प्रशासनाविरोधात छेडण्यात येईल असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्ते संतोष भोकटे यांनी केले.