आदर्शगाव भातसई येथे श्री महादेवी मातेचा नवरात्र उत्सव

Share Now

42 Views

धाटाव (वार्ताहर) हाकेला धावणारी नवसाला पावणारी आदर्शगाव भातसई येथिल श्री. महादेवी मातेचा नवरात्र उत्सव भक्तीमय वातावर्नात साजरा झाला आहे. सालाबादप्रमाणे घटस्थापनेच्या दिवशी भातसई गावातुन पालखी फिरून महादेवी मंदीरात जाते. गावचे भगत चितामणी खरीवले यांच्या आगात देवीचा वारा येतो भातसई, झोळाबे, लक्ष्मीनगर, कोपरे गावातील भक्तगण आईच्या मंदिरात मोठ्या संख्येने उपस्थितीत आसतात. महादेवी आईची घटस्थापना उदो उदो चाग भल गजरात होत असतो. श्री महादेवी मातेची घटस्थापना झाल्यानंतर चारी गावातील घरचे देवाची ( कुल देवताचे )घटस्थापना केली जाते. आईच्या मंदिरात नवसकरी नऊ दिवस उपवास धरून मंदिरातच राहतात. आईची गोधंली नऊ दिवस तिन वेळा आरती करतो. आईच्या दर्शनासाठी रायगड जिल्ह्यातील, मुंबई, पुणे येथून भाविक येत आसतात. नऊ दिवस काकड आरती प्रवचन, हरिपाठ, किर्तन,भजन, नाच गाणी विविध कार्यक्रम होत आसतात. खरिवले, कोतवाल, थोरवे, उशिरकर, जोशी, पोळेकर, म्हात्रे, गवळी, जाबेकर, रटाटे, कनोजे, सकपाळ, पाटील, हे भातसई गावातील परिवार कार्यक्रम उपस्थितीत आसतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *