101 Views
उरण (विठ्ठल ममताबादे) केंद्रीय राज्यमंत्री जहाज व बंदरे मा. शांतनू ठाकूर यांची कोलकत्ता येथे भारतीय पोर्ट आणि डॉक मजदूर महासंघाच्या शिष्ट मंडळाने भेट घेतली. भेट घेउन देशभरातील बंदर कामगारांच्या समस्या शिष्ट मंडळाने केंद्रीय मंत्री शांतनू ठाकूर यांच्या समोर मांडल्या. यावेळी शिष्ट मंडळाच्या वतीने केंद्रीय मंत्री शांतनू ठाकूर यांना निवेदन देण्यात आले. व विविध समस्यावर सविस्तर चर्चा झाली. कामगारांच्या समस्या समजून घेउन संबंधित पोर्टचे चेअरमनना योग्य त्या सूचना देण्यात येतील व सहकार्य असेल असे आश्वासन यावेळी केंद्रीय मंत्री शांतनू ठाकूर यांनी शिष्टमंडळाला दिले. या शिष्ट मंडपोर्ट महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधीर घरत, पोर्ट प्रभारी अण्णा धुमाळ, कोलकत्ता पोर्टचे समीर मुजुमदार आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.