वन महोत्सव सप्ताह निमित्त रानमेवा वृक्षारोपण

Share Now

199 Views

उरण (विठ्ठल ममताबादे ) १ ते ७ जुलै हा आठवडा वन महोत्सव म्हणून ओळखला जातो. मानवाला निसर्गाविषयी प्रेम व आदर निर्माण व्हावा ह्या हेतूने १९५० सालापासून भारतात वन महोत्सव साजरा करण्यात येतो. आणि ह्या सप्ताहाचे औचित्य साधून वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या वतीने उरण तालुक्यातील चिरनेर बेल डोंगरी आनंद वनात रानमेवा वृक्षारोपनाचे आयोजन केले होते. रानमेवा फळ झाडांमधे आंबा, पेरू, आवळा, जांभूळ, फणस, बोर, चिंच, रांजण ईत्यादी रोपांचे समावेश करुन वन महोत्सव साजरा करण्यात आले. वन्यजीव, पक्षी व भावी पिढीस हा रानमेव्याचे आस्वाद घेईल व रानमेव्याची मेजवाणी कायम जोपासली जावी ह्या हेतूने वृक्षारोपन करण्यात आले. त्याचप्रमाणे वन्यजीव संस्थेचे सिद्धेश मढवी आणि मनिष मढवी व ईतर पक्षीमित्रांनी १८ जून रोजी जखमी अवस्थेत सापडलेल्या घार पक्ष्यास दोन आठवडे योग्य उपचार करुन जीवनदान देत आजच्या दिनी बेलडोंगरीच्या निसर्ग सानिध्यात मुक्त करण्यात आली. यावेळी अध्यक्ष विवेक केणी, उपाध्यक्ष दिलीप मढवी, पत्रकार महेश भोईर, रायगड भूषण महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज पाटील, वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी, मोहन फुंडेकर, वसंत वळकुंडे, महेश मिरगे, केशव ठाकूर, दिनेश चौलकर, अभय मढवी आदि निसर्गमित्र उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *