बहराई फॉउंडेशन तर्फे वृक्षारोपण

Share Now

150 Views

उरण ( विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील इंद्रायणी मंदिराच्या परिसरात “बहराई फाउंडेशन” कडून वृक्षारोपण करण्यात आले. “बहराई” गेल्या अनेक वर्षांपासून उरण परिसरात वृक्षारोपण करत आलेली आहे. यासोबतच लावलेल्या झाडांचे संगोपन अतिशय योग्य रित्या नेमाने करते; याच कारणाने बहराईच्या उपक्रमांत नागरिकांचा उस्फुर्त सहभाग पाहायला मिळतो.

बहराई फाउंडेशन, प्रामुख्याने निसर्ग अभ्यास करत असल्याने तेथील परिसंस्था, अधिवास आणि त्याठिकाणी अढळ असलेल्या पक्षी वा अन्य वन्यजीवांचा विचार करूनच वृक्षारोपणासाठी झाडांची निवड करते. यावेळी वृक्षरोपणात अर्जुन, काटेसावर, मोहा, कदंब, बकुळा, वड, पिंपळ, उंबर, बेल, सिताअशोक, सोनचाफा आणि पारिजात आदी झाडांचा समावेश करण्यात आला होता.

वृक्षरोपण इंद्रायणी सारख्या अतिशय प्रेक्षणीय स्थळी असल्याने सहभागी निसर्ग सेवींचा उत्साह देखील शिगेला होता. या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात कमालीची रम्यता दाटलेली असते. शिवाय सभोवारच्या डोंगरदऱ्यांमध्ये बिलगलेल्या ढगांची दाटी डोळ्यांसमोरून सरकताना आभाळाच्या स्पर्शाचे अनुभूती देत राहते.सदर उपक्रमामध्ये उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, केअर ऑफ नेचर संस्थेचे संस्थापक, महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर, श्रीधर मोकळ , विलास गावंड, सचिन वर्तक, पद्माकर देशमुख अशा सामाजिक क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्या व्यक्ती उपस्थित होत्या. बहराई फाउंडेशनचे कोषाध्यक्ष सुरेंद्र पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजिलेल्या ह्या वृक्षरोपण कार्यक्रमात बहराईचे अध्यक्ष हरीश पाटील, उपाध्यक्ष अंगराज मात्रे, सरचिटणीस वैभव पाटील, यांसोबतच आशिष ठाकूर, अंकिता ठाकूर, पूजा कांबळे, भारती ठाकूर, हेमांगी पाटील, अंजनी ठाकूर. कांचन पाटील, सिद्धार्थ कांबळे, दौलत पाटील, राम पाटील, महेश पालकर, अदिती, नम्रता अदी.निसर्गप्रेमी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *