उरण ( विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील पुनाडे आदिवा़सी वाडीतील गेली १५ वर्षापासून दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.
महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे, स्व. तृप्ती सुधिर सुर्वे फाऊंडेशन उरण, स्व. संगिता मच्छिद्र ठाकूर फाऊंडेशन धुतूम व स्व. स्मिता नामदेव घरत फाऊंडेशन कोपर यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य वैजनाथ ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्या कुंदाताई ठाकूर, महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे चे संस्थापक अध्यक्ष मनोज पाटील, नेहरू युवा केंद्राचे माजी राष्ट्रीय सेवाकर्मी आकाश घरत, मानसी ठाकूर, विशाल पाटील, वाडीतील प्राथमिक शिक्षक प्रमोद नवाले, मकरंद ठाकूर आदि मान्यवर उपस्थित होते. गेली १५ वर्षे हे कार्य अविरत पणे सुरु आहे. या वर्षीही हे शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना मिळालेल्या शैक्षणिक साहित्य व गणवेशामुळे वाडीतील पालकांना व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.