उरण (विठ्ठल ममताबादे) उरण क्रिकेट समालोचक असोशिएशन ही क्रिकेट खेळाच्या क्षेत्रातील समालोचक (निवेदक) यांची संघटना असून ही संघटना 13 नोव्हेंबर 2016 साली स्थापन झाली. फक्त क्रिकेट खेळाला प्रोत्साहन न देता शिक्षण व सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत राहून गोरगरिबांना आधार देणे या दृष्टीकोणातून ही संघटना स्थापन झाली असून या उरण क्रिकेट समालोचक असोशिएशनच्या माध्यमातून आजपर्यंत 12 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या 27 मुलींचा शिक्षणाचा खर्च करण्यात आला आहे. एक मूलगी पोलीस भरतीसाठी तर दुसरी मुलगी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. तसेच या संस्थेच्या माध्यमा तून दरवर्षी आदिवासी वाडीवर व मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटपही केले जाते.
गोरगरीबांना अर्थ सहाय्य देण्याचा कार्यक्रम यावर्षी श्रीराम मंदिर चिर्ले (उरण) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाची प्रस्तावना संघटनेचे अध्यक्ष प्रसाद भोईर यांनी केली. प्रस्तावनेत त्यांनी असोसिएशनचे ध्येय व उद्दिष्टे काय आहेत ती सांगितली. त्यानंतर श्रीराम मंदिर चिर्ले (उरण) येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात एकूण 6 मुलींना पुढील शिक्षणासाठी अर्थ सहाय्य करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी सुधाकर भाऊ पाटील (सरपंच चिरले), सुनील नरेश कडू सोनारी (युवा उद्योजक), समाधान माळी चिरले(उद्योजक), गोपीनाथ म्हात्रे जासई(उद्योजक), गुरुनाथ तांडेल सुरूनपाडा (सामाजिक कार्यकर्ते ), सुनील शाताराम मढवी,विश्वनाथ म्हसकर नारिवली ठाणे(उद्योजक),राजन कृष्ण घरत, निवृत्ती धनाजी पाटील, प्रमोद रामानाथ माढवी (शाखा प्रमुख ), रवींद्र कासुकर (दादरपाडा), सत्यवान म्हात्रे (वळवली), श्रीकांत पाटील (गावठाण) आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी ह्या उरण क्रिकेट समलोचक असोसिएशनच्या समाजपयोगी कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन रोख धनादेश सुद्धा सुपूर्त केला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उरण क्रिकेट समलोचक असोसिएशनचे सल्लागार आत्माराम म्हात्रे यांनी तर असोशिएशनचे खजिनदार प्रल्हाद कासुकर व सचिव मेघनाथ मढवी यांनी आभार प्रदर्शन केले. उरण क्रिकेट समलोचक असोसिएशनच्या माध्यमातून समाजातील गोर गरीब विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीतून शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळत असल्याने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीही असोसिएशनचे यावेळी आभार मानले आहेत.