नगरपालिका क्षेत्रात स्वच्छता अभियानाचे आयोजन

Share Now

34 Views

उरण- (विठ्ठल ममताबादे) शहरांमध्ये फक्त सुशोभिकरणच नव्हे तर सातत्याने स्वच्छताही आवश्यक आहे. प्रशासनाने शहरांच्या स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील विविध नगरपालिका क्षेत्रात दि. ४ ऑगस्ट २०२३ रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मागील महिन्या प्रमाणे उरण शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर अभियानात उरण शहरातील सर्वोदय वाडी, नगर परिषद कार्यालय परिसर, विमला तलाव, तहसील कार्यालय परिसर, तुंगेकर बालोद्यान या ठिकाणी सफाई करण्यात आली. सदर अभियानात एकूण ३ टन कचरा उचलण्यात आला. या अभियानात उपजिल्हाधिकारी जनार्दन कासारे, तहसीलदार उद्धव कदम , वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम तसेच उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे, लेखापाल सुरेश पोसतांडेल, नगररचनाकार सचिन भानुसे, बांधकाम अभियंता झुंबर माने, माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, माजी नगर सेवक कौशिक शहा, प्रसाद मांडेलकर, यांचे श्रमदानातून पार पडले. तसेच उरण नगर परिषद शाळा क्र १,२,३ चे शिक्षक तसेच विद्यार्थी, माय नॉलेज चे विद्यार्थी यांनी सदर अभियानात भाग घेऊन श्रमदान केले. सदर स्वच्छता अभियाना मुले उरण शहर स्वच्छ होण्यास नक्की मदत होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विविध सामाजिक संस्था, संघटना, पर्यावरण प्रेमी, नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *