कै. प्रशांत भाऊ पाटील यांच्या शोकसभेचे आयोजन

Share Now

99 Views

उरण (विठ्ठल म‌मताबादे) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) या पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस प्रशांत भाऊ पाटील यांचे २० जून २०२४ रोजी हदयविकाराने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर दुखाःचे डोंगर कोसळले आहे. प्रशांत भाऊ पाटील यांचे कुटुंब, नातेवाईक व मित्र परिवारावरही शोककळा पसरली आहे. प्रशांत पाटील यांचे असंख्य चाहते समर्थक नवी मुंबई, मुंबई, रायगड जिल्हयात मोठया प्रमाणात आहेत. या सर्वांना प्रशांत भाऊच्या जाण्याने खूप मोठा धक्का बसला आहे. प्रशांत भाऊ हे मनमिळावू, प्रेमळ, सर्वांना सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्यावर प्रेम करणारा खूप मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. त्यांच्याप्रती आदरभाव व प्रेम व्यक्त करण्यासाठी, प्रशांत भाऊ पाटील यांच्या कार्याला, विचारांना, आठवणींना उजाळा देउन त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्याच्या दृष्टीकोनातून गुरुवार दि २७ जून २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता मल्टीपर्पज हॉल, जेएनपीटी टाऊनशिप उरण येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *