भुवनेश्वर ते तळाघर हद्द पर्यंत मूठभर वृक्षप्रेमींनी रस्त्याच्या दुतर्फा पिंपळ, वड, चेरी, गुलमोहर सर्व प्रकारची झाडे लावली, अनेक झाडे मोठी होऊन चांगली बहरली, इतर झाडे मध्यान्ह आलीत, बोरघर तरुणांनीही प्रचंड झाडे वाढविली.
काल परवा तळाघर ग्रामस्थ, महिलांनी भव्य वृक्षारोपण केले, निवी वृक्षप्रेमी टीम झाडे लावतच आहे, अशात मंगळवारी PWD रोहा विभागाने तळाघर हद्द उर्वरित टीचभर जागेत २०,२५ झाडे लावल्याचे समोर आले आणि आश्चर्याचा धक्का बसला, मुळात PWD रोहा काही अधिकारी रस्ता, त्याची साईडपट्टी खातच आले आहेत, हे नवे नाही, यावर्षी तर खूप काही आहे, काही विचारू नका.
जे काम वृक्षप्रेमी श्रमदानातून करतात, ते काम PWDने अनेक मजूर लावून केले, हजारो रुपये खर्च करून झाडेही आडवे तिडवी लावलीत, धड खड्डे नाहीत, टेकू नाही, त्यातही संवर्धन करण्याची हमी काय…
भीती एकच,
झाडे लावली २०,२५, पण बिल आमचीही झाडे मिळून ५ किमी अंतरावरील झाडांची काढतील, यात अधिकाऱ्यांची मास्टरकी आहे. यात हुशार अभियंता पाटील यांचा हात कोणी धरणार नाही. हीच स्थिती इतर रस्त्यांकडेच्या झाडांची आहे.
👆🏼