उरण ( विठ्ठल ममताबादे ) संपूर्ण उरण तालुक्यात अनधिकृत पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात उम्र रुप धारण केली आहे. अनधिकृत पार्किंग मूळे दरवर्षी उरण तालुक्यात अनेकांचे बळी जात आहेत.विविध अपघात व अनधिकृत पार्किंग मुळे आजपर्यंत ८०० हुन जास्त व्यक्तींचा मृत्यू उरण मध्ये झाला आहे.त्यामुळे या पार्श्वभूमीवर उरण परिसर व मुख्यत्वे करून शंकर मंदिर जासई,हायवे मार्गावर डिसीपी मा. तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीमती वैशाली गलांडे व ट्रॅफिक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अनधिकृतपणे असलेल्या वाहनांवर कारवाई केली. यावेळी कंटेनर , मालवाहतूक गाड्या, टेम्पो, ट्रक आदि वाहनांवर, वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाई मूळे उरण परिसर, जासई शंकर मंदिर, NH4B हायवे रोड आदि परिसर मोकळा झाला आहे. अनधिकृत पार्किंग करणारे वाहने हटविल्याने नागरिकांचा प्रवास सुलभ, आनंददायी झाला आहे.
अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनांवर पोलिस प्रशासनातर्फे कारवाई
90 Views