रोहा (वार्ताहर) उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथील शेतकरी आपल्याला न्याय व हक्क मिळवण्यासाठी आंदोलन करीत असताना यादरम्यान जीपने शेतकऱ्यांना चिरडून ठार मारण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेला उत्तर प्रदेशातील योगी व दिल्लीतील मोदी सरकार दोषी असल्याचा आरोप करीत या घटनेचा रोहा शहर काँग्रेस पक्षाने निषेध केला आहे. या घटनेचा निषेधार्थ तहसीलदार कविता जाधव यांना निवेदन देण्यात आले आहे.
लखीमपूर येथील दुर्दैवी घटनेबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी तथा नगरसेवक समीर सकपाळ, रोहा शहर अध्यक्ष नितेश कल्याणी, माजी तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, शहर युवक अध्यक्ष विनोद सावंत, युवा नेते अमोल देशमुख, अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष तय्यब अली मुमेरे, बाळू साळवी, शैलेश कदम, निलेश शेडगे, संदेश सावंत, सागर कोठारी, दीपक कोरपे, भरत कोतवाल आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.