रोहा (रविंद्र कान्हेकर) आपल्या आसपासच्या परिसरात उजाड जागा असतील, त्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त झाडे लावण्याच्या निश्चय करू, आजच्या परिस्थितीत वृक्षारोपण ही प्रभावी चळवळ बनली पाहिजेत, ते फार गरजेचे आहे, मात्र योग्य झाडांची निवड करणे क्रमप्राप्त आहे. झाडे लावत असताना त्यांच्यामुळे इतर झाडांना त्रासदायक ठरतील किंवा शेतात नांगरणी करत असताना वाढलेल्या झांडामुळे शेती त्रासदायक ठरणार नाही, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. त्यात औषधी वनस्पती ही असायला पाहिजेत. त्यामुळे झाडांची निवड करत असताना अभ्यास करून, माहिती घेऊनच चांगली झाडे लावली पाहिजेत असे प्रतिपादन आरआयएचे अध्यक्ष पी पी बारदेशकर यांनी केले. रविवारी तळाघर ते बयोज फार्म रस्ता दुतर्फा वृक्षलागवड कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी आरआयएचे अध्यक्ष पी पी बारदेशकर, सुदर्शन कंपनी साईट हेड विवेक गर्ग, वनपरीक्षेत्र अधिकारी मनोज वाघमारे, कळसगिरी प्रोजेक्ट प्रमुख सुरेंद्र निंबाळकर, सिटीझन फोरमचे निमंत्रक आप्पा देशमुख, वनरक्षक विकास राजपूत, वैभव बत्तीसे, अनंत देशमुख, तळाघर हायस्कुल चेअरमन विठ्ठल मोरे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके, रोहा प्रेस क्लब अध्यक्ष राजेंद्र जाधव, माजी अध्यक्ष शशिकांत मोरे, उपाध्यक्ष उद्धव आव्हाड, रवी दिघे, समिधा अष्टीवकर, निधी गर्ग, विदुला परांजपे उपस्थीत होते.
यंदाच्या पावसाळ्यात सुदर्शन कंपनी, एल्पे कंपनी, रोहा प्रेस क्लब, वनविभाग रोहा, नेचर फ्रेंड्स ग्रुप व रोटरी क्लब ऑफ रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने जास्तीत जास्त झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. रविवारी बयोज फार्म ते तलाघर रस्ता दुतर्फा वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. यावेळी झाडे लावा, झाडे जगवा, आपला परीसर हिरवेगार करा असा संदेश देणारे फलक लावण्यात आले होते.
कोट :
ज्याप्रकारे तळाघर रोडवर वृक्षारोपण केले त्याप्रमाणे किल्ला धाटाव परिसरात अधिकची झाडे लावण्याचा संकल्प आम्ही करीत आहोत. रोहा सारखे वातावरण संबंध देशात नाही. गेली बारा वर्षे मी येथे राहतो मला खुप बरं वाटलं.
– विवेक गर्ग
साईट हेड, सुदर्शन कंपनी
कोट :
जंगलात निसर्गनिर्मित झाडे अनेक तयार होतात. आपण वृक्षारोपण करतो मात्र संगोपण करणारे आपल्यासारखे लोकं असतात. मात्र काही समाजकंटक वणवे लावतात. त्यामुळे जंगले वाचविण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायला पाहिजे
– मनोज वाघमारे
कोट :
आरआयएकडून आम्ही कलरकेम कंपनी ते गंगा पुलापर्यंत दुतर्फा झाडे लावणार आहोत. तसेच एक हजार एकर ओसाड जमीन देण्याची वानविभागाकडे माझी मागणी आहे, त्या जमिनीवर आम्ही झाडे लावणार आहोत.
– पी पी बारदेशकर
अध्यक्ष, आरआयए धाटाव