रोहा (वार्ताहर) रोट्रॅक्ट क्लब ऑफ रोहा सेंट्रलच्या कार्यकारणीची सभा माजी अध्यक्ष रोट्रॅक्टर धैर्या वत्सराज यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच संपन्न झाली. या सभेत रोट्रॅक्ट क्लब ऑफ रोहा सेंट्रलच्या अध्यक्षपदी रोट्रॅक्टर सत्येन देशपांडे, तर सचिव पदी रोट्रॅक्टर यश शिंदे यांची सर्वनुमते निवड करण्यात आली.
या सभेत माजी अध्यक्ष रोट्रॅक्टर धैर्या वत्सराज यांनी रोट्रॅक्टर सत्येन देशपांडे यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार सोपविला. तसेच माजी सचिव रोट्रॅक्टर सृष्टी वाणी व रोट्रॅक्टर मितेश गायकर यांनी रोट्रॅक्टर यश शिंदे यांच्याकडे सचिवपदाचा कार्यभार सुपूर्द केला. यानंतर कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली. रोहा शहर व तालुक्यामध्ये रोट्रॅक्ट क्लबच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याचे नवनिर्वाचित रोट्रॅक्ट अध्यक्ष सत्येन देशपांडे यांनी निवडीनंतर प्रतिक्रीया देताना सांगितले.