धाटाव एमआयडीसीतील अनेक कंपन्या गॅसवर, कायमस्वरूपी कामगारही सक्तीच्या रजेवर ! कंपन्या सावरणार कधी, तंत्रशिक्षित बोगस कामगार मुद्दाही ऐरणीवर

Share Now

413 Views

रोहा (राजेंद्र जाधव) धाटाव एमआयडीसीतील अनेक छोट्या बड्या कंपन्यांना जागतिक मंदी, स्पर्धा, युक्रेन रशिया युद्धाचा फटका बसला आहे. काही कंपन्यांना कच्चा माल उपलब्ध होत नाही. काहींचा पक्का माल बाजारपेठेत जात नाही अशा कैचीत अनेक कंपन्या सापडल्यात. काही वर्षांपूर्वी सुरू झालेली मजदा कंपनी तब्बल एकदीड महिना बंद होती. मजदाने कायमस्वरूपी कामगारांनाही घरी बसवले होते. पाठोपाठ ट्रान्सवर्ड कंपनीची स्थिती अत्यंत नाजूक झाली. कायम कामगारांना पंधरा दिवस रजा, पंधरा दिवस हजेरी चालू राहिली, याच टेन्शनमध्ये आता रंगद्रव्य उत्पादित राठी डायकेम कंपनीची भर पडली. कायम स्वरूपी कामगारही सक्तीच्या रजेवर पाठवण्याची नामुष्की राठी डायकेम कंपनीवर आली. जागतिक मंदीच्या लाटेचा फटका बसलेल्या कंपन्या पूर्ववत होणार कधी, सावरणार कधी ? असा सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान, एमआयडीसीतील अनेक कंपन्या गॅसवर जात असल्याने कंपनीत काम करणारे कायम कामगार, ठेकेदारीतील कामगार यांसह कंपनीवर अवलंबून असलेले सर्वच घटक अक्षरशः टेन्शन मे असेच धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे, तर प्रख्यात मजदा कंपनीने कंपनी तोट्यात असल्याचे भासवत कामगारांना कृत्रिम पद्धतीने घरी बसवले होते. हेही यानिमित्त चर्चेत आले आहे.

धाटाव एमआयडीसीतील प्रख्यात सुदर्शन, युनिकेम, एक्सेल, तत्कालीन क्लरीअंट कंपन्यांसह मजदा, ट्रान्सवर्ड कंपन्यांना जागतिक मंदीचा फटका बसला. बहुतेक कंपन्यांचे अनेक उत्पादित माल प्लॅन्ट आजही बंद आहेत. त्यामुळे ठेकेदारांतील कामगारांना मोठा फटका बसला. मूळात अनेक कंपन्यांचे धोकादायक प्लॅन्ट कंत्राटी कामगार चालवत आलेत, याकडे कारखाना निरीक्षक विभाग अधिकारी खाते धोरणातून कधीच लक्ष देत नाही. एवढेच काय ? अनेक मोठ्या कंपन्यात तंत्राशिक्षित कार्यरत असलेल्या कामगारांच्या एओसीपी, एमएमसीपी सर्टिफिकेट बोगस असल्याच्या चर्चेने कंपन्यांनी कायम धोका वाढवून ठेवला. यात युनिकेम, एक्सेल कंपनी आघाडीवर आहे. याच बहुचर्चित अनेक कंपन्या अक्षरशः गॅसवर आल्यात. आधीच मजदा, ट्रान्सवर्ड कंपनीची स्थिती अत्यंत नाजूक झाली. त्यात आता रंगद्रव्य उत्पादित राठी कंपनीची भर पडल्याने कामगार विश्वात चिंता वाढली. कच्चा माल उपलब्ध होत नाही. युक्रेन रशिया युद्धाचा अजूनही फटका जाणवत आहे तर तयार माल बाजारात जात नाही, सुरत बाजारपेठेत अधिकच माल पडून आहे. यामुळे राठी डायकेम व्यवस्थापनाने कंत्राटी मुख्यतः आता कायम कामगारही आठवडाभर घरी बसल्याचे समोर आल्याने कंपन्यांची स्थिती सुधारणार कधी ? असा सवाल उपस्थित झाला आहे.

धाटाव एमआयडीसीतील कंपन्यांत अनेक प्रश्न उपस्थित झालेत. आग व प्रदूषणाच्या नेहमीच्या मुद्यांनी अनेक कंपन्या धोकादायक झाल्यात. त्यातच तंत्रशिक्षीत कामगारांच्या पदव्यांची खात्री करून घेतली जात नसल्याने कंपन्यांनी अधिक धोका वाढवून घेतला. यात दोन कंपन्या अधिक अग्रेसर आहेत, हे वास्तव असतानाच अनेक कंपन्यांना स्पर्धात्मक, जागतिक मंदीत गरगर लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. सुदर्शन, एक्सेल, युनिकेम बहुतेक कंपन्यांचे अनेक प्लांट बंद आहेत, तर मजदा, ट्रान्सवर्डपाठोपाठ राठी डायकेम कंपनीलाही जागतिक मंदीचा फटका बसला. त्यात मजदा कंपनी पूर्ववत झाल्याचे सांगण्यात आले, मूळात मजदा कंपनी व्यवस्थापनाने जागतिक मंदीची कृत्रिम स्थिती निर्माण केली आणि कामगारांना वेठीस धरल्याची तुफान चर्चा सुरू झाली. ट्रान्सवर्ड कंपनीही पूर्ववत होण्याचे संकेत मिळत आहे, याच धक्कादायक प्रकारात रंगद्रव्य उत्पादीत राठी डायकेमलाही गरगर लागल्याने कामगार विश्वात चिंता व्यक्त झाली आहे. दरम्यान, धाटाव एमआयडीसीतील अनेक छोट्या मोठ्या कंपन्या जागतिक मंदीत अडकल्याने सर्वच घटकांचे टेन्शन वाढले आहे. शिक्षीत, तंत्रशिक्षीत वाढत्या तरुणांना रोजगार उपलब्ध होणार कसा, रोजगारसंबंधी अराजकता माजेल, त्यामुळे कंपन्या वेळीच सावरण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असे तज्ञातून बोलले जात आहे, तर कंपन्यांना आधीच मंदीच्या फटका, त्यात धोकादायक प्लांटमध्ये तंत्रशिक्षीत बोगस सर्टीफाय कामगारांची बेधडक भरती केल्याने धोका अधिक वाढवून घेतला, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *