रोहा (राजेंद्र जाधव) बहुचर्चित वरसे ग्रामपंचायतीत मागील पंधरवड्यात एक काम चांगले झाले. सबंध विभागातील नागरिकांच्या रहदारीसाठी कायम अडथळा ठरणारी झोपडपट्टीतील वाढीव अतिक्रमण हटवले, रस्त्याने खूप वर्षानंतर मोकळा श्वास घेतला. याबद्दल नागरिकांनी नेते मधुकर पाटील, सरपंच नरेश पाटील, प्रशासन सर्वांनाच धन्यवाद दिले. दुसरीकडे ग्रा.पं.त प्रशासनाचा गलथान कारभार संपण्याचे नाव घेत नाही. नगर, वाडीवस्तीत कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली. अनेक दिवस गाजत असलेल्या डंपिंग ग्राउंडला जागा मिळवण्यात प्रशासनाला अडथळे पार करून यश आले. मात्र डंपिंग ग्राउंड, मोरी, त्यासाठीचा रस्ता यावर ग्रा.पं.तीला लाखो रुपये खर्च करावे लागले ही दमछाक असतानाच प्लॉटिंगसाठी जमीन मालकाने सर्व नियम धाब्यावर बसवून अख्खा डोंगर पोखरून खिळखिळा केला आणि सैल झालेली चिखलमय माती डंपिंगकडे जाण्याच्या रस्त्यावर आल्याने कचरा प्रक्रीया बंद पडली. पर्यायाने रस्ते, नाले, वस्तीत सगळीकडे पुन्हा कचऱ्याचे ढीग दिसत आहे. यातून सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचे चिन्ह दिसत आहे अशात पोखरलेल्या डोंगरातून माती, दगडधोंडे थेट कालव्यात, रस्त्यात येण्याच्या शक्यतेने पूरस्थिती निर्माण होईल अशी भीती आता व्यक्त झाली आहे. खाजगी मालकी असली तरी डोंगर पोखरून पूरस्थिती निर्माण होण्याच्या घटनेला नेमके जबाबदार कोण ? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. दरम्यान, डोंगर पोखरून माती खिळखिळी करण्यासाठी जमीन मालकाला सर्वार्थाने मुभा देणाऱ्या, त्यावर उपाय योजना करून न घेता अनेकांनी बिनधास्त पाठबळ दिले, यामागे नेमके गौडबंगाल काय ? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
वरसे ग्रा.पं.त पाणी योजना, रस्ते, गटारे सर्वच कामे नेहमीच वादादीत ठरत आलीत. तरीही पाणी, रस्ते अनेक सुधारणा होत आहेत, त्यातच भुवनेश्वर दोन्ही रस्त्यांचे डांबरीकरण त्यापाठोपाठ कायम वैताग ठरलेल्या झोपडयांतील अतिक्रमण ग्रा.पं.तीने हटविल्याने लोकप्रतिनिधींना धन्यवाद मिळत आहे. दुसरीकडे कचरा व्यवस्थापन डम्पिंग ग्राउंड विषय प्रशासनाला नेहमीच डोकेदुखी ठरला. आधीच दोनतीन महिने डम्पिंग ग्राउंड नव्हता, त्यामुळे कचऱ्याची भयानक स्थिती उद्दभवली. त्यातून मार्ग काढत लाखो रुपये खर्च करून दूरवर डम्पिंग ग्राउंड यंत्रणा उभी केली. त्यासाठीचा रस्ता, मोरी, कंपाउंड यावर लाखो रुपये खर्ची पडले अशात कचरा समस्या मिटणार तोच उपाययोजनात अक्षरश: धोंडा पडला आणि डम्पिंग ग्राउंड विषय डोकेदुखी ग्रा.पं.तीच्या पुन्हा पदरी पडली. शिल्प नगरीतील डोंगर जमीन मालकाने प्लॉटींग करण्यासाठी पोखरल्याने गंभीर स्थिती निर्माण झाल्याचे दृश्य दिसत आहे. दुसरीकडे मुसळधार पावसाने खिळखिळा डोंगर सुटून गाळाने कालवा भरल्यास एकता नगर, गणेश नगर वस्तीत अधिक पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका संभवत आहे. त्यातच डोंगराचा गाळ डम्पिंगकडे जाणाऱ्या रस्त्यावर आल्याने चक्काजाम झाला. कचरा प्रक्रिया पुन्हा बंद झाल्याने रस्ता, नाले, गटार, कालवा अक्षरशः कचऱ्याने भरून गेला आहे. याकडे प्रशासन गांभिर्याने पाहत नाही. ग्रामसेवक अशोक गुट्टे नेहमीप्रमाणे निष्क्रिय ठरलेत, संपर्काला प्रतिसाद देत नसल्याने संतापात अधिक भर पडली. प्लॉटींगसाठी डोंगर पोखरत असताना जमीन मालकाला अनेकांनी भक्कम पाठबळ दिले, पुढचा धोका ओळखून सबंधीत मालकाकडून उपाययोजना करून घेतल्या नाहीत ? यामागे नेमके गौडबंगाल काय ? असा सवाल उपस्थित झाला. आधीच दरवर्षीच्या पावसात कालव्याचे पाणी कायम रस्त्यावर येतो, अनेकांच्या जमिनींची पूर्णत: वाट लागली. आतातर कालव्याचा रस्ता सतत पाण्यात आहे, लोकांना मनस्ताप सहन करावे लागते, हे दरवर्षाचे रडगाणे असताना सैल डोंगराची माती पूरस्थितीला अधिक बळ देईल हे सरपंच, ग्रामसेवक सर्वच कारभाऱ्यांना कळू नयेत याचे आश्चर्य वाटत आहे. डम्पिंग ग्राउंडचा रस्ता डोंगर पोखरणे कामाने खड्ड्यात घालत लोकांच्या संतापात भर, लाखोंचा खर्च देणाऱ्या सबंधीत जमीन मालकाला सबंधीत कारभारी काय धडा शिकवितात की भलत्याच कारणाने मौन बाळगतात ? हे पाहणे औत्सूक्याचे ठरणार आहे.