रोहा (महेंद्र मोरे) रोहा शहरानजीक असणाऱ्या खारी गावातील काजुवाडी येथे राहणारा सचिन वैजनाथ शिंदे हा ३० वर्षे वयाचा युवक बेपत्ता झाला आहे. मंगळवार ४ जुलै रोजी हा युवक गायब झाला आहे. नातेवाईकांनी त्याच्या सर्वत्र शोध घेतल्यानंतर त्याचा कोणताही ठावठिकाणा न लागल्यामुळे अखेर रोहा पोलिसांत तो हरवल्याची तक्रार नोंद केली आहे.
यासंबंधी रोहा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ४ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घरात कोणाला काहीही न सांगता सचिन हा घरातून बाहेर पडला. त्याची उंची ५ फुट ५ इंच असून रंग गोरा व बांधा मजबूत आहे. त्याचा चेहरा उभट असून केस काळे व दाढी मिशी वाढवलेली आहे. ज्यावेळी तो घरातून बाहेर पडला त्यावेळी त्यांचे अंगात काळ्या रंगाचा टिशर्ट व निळ्यारंगाची जीन्स ची पॅंट आहे. रोहा पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर निरीक्षक प्रमोद बाबर यांचे मार्गदर्शनाखाली पो. ना. बी. एन. शिद हे करत आहेत. यासंबंधी कोणाला काहीही माहिती मिळाल्यास 02194 २३४९३३, ९८२१६७ २१९०, ९६३७३५४७६५ या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन रोहा पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.